ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या
ट्रेंडिंग

१ मे पासून राज्यात मोफत येतोय ‘आपला दवाखाना’; जाणून घ्या फायदे..

Apla Davakhana | राज्यातील सरकारने सामान्य नागरिकांना नवनवीन विविध सुखसुविधा पायाशी आणून ठेवल्या आहेत. अशातच आता नागरिकांसाठी आणखीन एक आनंददायी बातमी समोर येते. आता राज्यात १ मे पासून हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hindu Hrudaysamrat Balasaheb Thackeray) ‘आपला दवाखाना’ (Apla Davakhana) राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचणार आहे. यातील २७ दवाखाने हे संभाजीनगरमध्ये असतील.

अशातच निःशुल्क औषधी उपचार, मलमपट्टी, वैद्यकीय तपासणी अशा प्रकारच्या १४७ चाचण्यांची सेवा मिळणार आहे. सरकारी रुग्णालयावरही आता तासंतास उभा राहायची गरज नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ‘मोहल्ला क्लिनिक’च्या आधारे महाराष्ट्रात ‘आपला दवाखाना’ ही संकल्पना राज्यात राबवली जाणार आहे. यामुळे राज्यात एकूण ७०० दवाखाने उभारण्यात येणार आहे.

शहरातील झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना छोट्या – मोठ्या आजारांसाठी जावं लागतं. मग ही मंडळी सरकारी दवाखान्यांमध्ये धाव ठोकतात. मात्र यावेळी अधिकाधिक रांगा असतात, उपचाराला उशीर, प्रवासाचा खर्च तसेच सरकारी हॉस्पिटलमध्ये ताण तणाव हा ज्याचा थेट विभाग आयसीयू, अपघात विभाग, आयसीयू प्रसूती विभाग याच्याशी संबंध आहे. यामुळे हे टाळले जावे यासाठी ‘आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे.

या ठिकाणी उभारण्यात येणार आपला दवाखाना

‘आपला दवाखाना’ ही योजना जिल्हा आणि तालुक्यात १५ ठिकाणी, तसेच महापालिका ठिकाणी १२ तसेच छावणी परिसरात २, अशा २९ ठिकाणी राबवण्यात येणार आहे.

यावर उपचार सुरू

या दवाखान्यात असंसर्गिक रोग नियंत्रण, दररोज रुग्ण तपासणी, लसीकरण, माता बाल संगोपन यावर उपचार केले जातील. रक्त, लघवी तपासणी या ठिकाणी केली जाते. तसेच बाह्यरुग्ण विभागाची सुविधा देखील या ठिकाणी असणार आहे.

हे कर्मचारी असतील

या दवाखान्यात परिचारिका, वैद्यकीय अधिकारी असतील. तर कर्मचाऱ्यांचे वेतन हे राष्ट्रीय आरोग्याच्या अभियान निधीतून केले जाणार आहे. तालुक्याच्या नगरपंचायत, नगरपालिकेत हे दवाखाने उभारले जातील. यावर मनपाचे नियंत्रण असेल

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: ‘Aapla Dawakhana’ is coming free of cost in the state from May 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button