ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

अरे बाप रे! बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाच्या पट्टयात वाढ; पुन्हा पावसाची शक्यता..

Unseasonal Rain | देशात आणि राज्यात एक महिन्याहून अधिक दिवस झाले मात्र पाऊस अजूनही पाठ सोडेना. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात तसेच अंतर्गत कर्नाटक ते उत्तर तामिळनाडूपर्यंत पाऊस थैमान घालत आहे.

समुद्रसपाटीपासून १.५ किमी खंडित वाऱ्याची स्थिती पहायला मिळत असून मराठवाडा आणि विदर्भात गारपिटीसह वादळी वाऱ्याची परिस्थिती पहायला मिळते. बहुतांश भागात वादळी वारे, पाऊस, गारपिटीचा दणका बसत आहे. मराठवाडा आणि विदर्भात वादळी वारे, पाऊस यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. मात्र अवकाळी पाऊस जरी होत असला तरीही उष्णतेच्या झळा सुरूच आहेत.

या भागात ऑरेंज अलर्ट जारी

मराठवाड्यातील बीड, जालना, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड तर विदर्भातील अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात गारपीट आणि जोरदार पाऊस इशर देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट (Oreange Alert) जारी करण्यात आला आहे.

या भागात येलो अलर्ट जारी

नंदूरबार, जळगाव, नाशिक, धुळे, नगर, पुणे, सातारा, सोलापूर तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर विदर्भात अकोला, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली भागात येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आले आहेत

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Vidarbha And Marathwada in unseasonal Rain To be continued; Oreange And Yellow single Alert

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button