पशुसंवर्धन

देशी गाई मधील प्रजनन व्यवस्थापन करताना, घ्या “ही” काळजी..

When managing the breeding of native cows, take care of this.

अनेक शेतकरी बंधू शेतीला पूरक असा व्यवसाय करत असतात. त्यामध्ये मत्स्यपालन, गोपालन, कुकुट पालन, शेळीपालन, हे व्यवसाय करत असतात, या व्यवसायामुळे भरभरून यश देखील प्राप्त होते, आर्थिक सुबत्ता वाढते, अशाच एका शेतीपूरक व्यवसायाची माहिती आपण घेणार आहोत, देशी गाई गोपालन व त्याचे व्यवस्थापण

देशी गाईचे दूध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी त्याचे प्रजनन व्यवस्थापन एक महत्त्वाची प्रक्रिया आहे . गाईपासून वर्षाला एक किंवा सोळा महिन्याला एक वेत मिळणे गरजेचे आहे. गाई व्यायल्यानंतर आपणास जास्तीत जास्त दूध मिळते व सात महिन्यानंतर ते दूध कमी होण्यास सुरुवात होते, परंतु देशी गाई मधील वंध्यत्व हा प्रमुख अडथळा आहे.


वंध्यत्वाची कारणे

🐄अनुवांशिक कारणामुळे होणारे वंधत्व हे कायमस्वरूपी प्रकारचे वंधत्व आहे. त्यावर कोणताही उपचार नाही ही जनावरे कधीच गाभण राहत नाही, नर वासरा सोबत जुळी जन्माला आलेली कालवड त्यामध्ये 99% पर्यंत वंध्यत्व निर्माण होण्याची शक्यता असते.

🐄असमतोल आहारामुळे जनावरांची झीज होते त्यामुळे दूध उत्पादनावर व गर्भाशयावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

🐄बऱ्याच वेळा देशी गाईंच्या अंगावर गोचीड शरीरातील रक्ताचे शोषण करतात, त्यामुळे त्याला आवश्यक असे द्रव्य मिळत नाही त्यामुळे गाईच्या वाढीवर परिणाम होतो.

🐄प्रस्तुती पूर्व एक महिना आणि प्रस्तुती नंतरचा एक महिना विशेष महत्त्व आहे, या काळामध्ये जनावरांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, या काळामध्ये देशी गाई विविध आजारांना बळी पडतात.


करावयाचे उपचार


🐄जनावरांची झीज कमी होण्यासाठी समतोल आहार देणे आवश्यक आहे त्यामध्ये हिरवा चारा, मेथी घास मका ,सुका चारा ,खुराक योग्य प्रमाणात देणे आवश्यक आहे.

🐄जनावरांना उसाचे वाढे, भाताचा पेंढा कमी प्रमाणात द्यावा.

🐄योग्य समतोल आहार खनिज मिश्रण योग्य मात्रा दैनंदिन जीवनात देणे आवश्यक आहे.

🐄तसेच जनावरांच्या मध्ये कृमींचा(गोचीड) प्रादुर्भाव होणार नाही, याकडे लक्ष द्यावे.

🐄वेळोवेळी वैद्यकीय चिकित्सा करून गाईचे आरोग्य तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.

🐄गोपालन करताना अनेक प्रकारच्या जाती निवडल्या जातात त्यांची वंशावळ देखील पाहिली जाते परंतु देशी गाई मधील व्यवसाय अधिक फायदेशीर ठरतो. या देशी गाई मधील प्रजनन व्यवस्था असताना कोणती काळजी घ्यायची याबद्दल आज आपण माहिती घेऊयात.

🐄देशी गाईंमध्ये गर्भधारणा तपासणी करण्यासाठी सर्वसामान्य दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो परंतु अल्ट्रा सोनोग्राफी यंत्राच्या साह्याने एका महिन्याच्या गर्भधारणा ची तपासणी करता येते.

🐄यंत्राच्या साह्याने तपासणी केल्यास पशुपालकांचा वेळ वाचतो व त्यामुळे 30 ते 60 दिवस आधीच तो गाईची व्यवस्थित काळजी घेऊ शकतो.

🐄अचुक व लवकर निदान झाल्याने जनावरांच्या विकारावर योग्य उपचार होऊ शकतात म्हणजेच काय एकूण भाकड काळ कमी होतो.

🐄अचूक निदान झाल्यास विकारांवरील औषध उपचारासाठी लागणारा खर्च कमी होतो व त्यातून उत्पन्न वाढण्याची क्षमता जास्त होते.

हे हि वाचा

  1. _कोणत्याही बँकेची मदत न घेता 70 वर्षीय श्री खर्डे यांनी शेतजोड व्यवसायातुन कमावले वर्षाकाठी 8 ते 9 लाख उत्पन्न…
  2. हरभरा दरवाढीचे संकेत पहा ‘किती ‘ रुपये पर्यंत जाऊ शकतो हरभऱ्याचा दर !!
  3. . ‘अशी करा’, सुगंधित गवातची लागवड आणि मिळावा भरघोस उत्पन्न!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button