इतर

“इतके ” मिनिटे घरी चालल्याने कळेल कोरोना झाला आहे की नाही? टास्क फोर्सने सांगितलेले टेस्ट वॉक नेमके आहे तरी काय…

Walking home for "so many" minutes will tell you if Corona has died What exactly is the test walk as told by the task force?

कोरोनामुळे संपूर्ण राज्यामधील जनता ही भेदरलेल्या अवस्थेमध्ये आहे, कोरोना बाबत अनेक गैरसमज देखील आहेत. अनेक लोकांचे भेदरलेल्या कारणामुळे म्हणजेच” हार्ट अटॅकने” मृत्यू होत आहे, ही वेळ संयम व धैर्याने संकटाशी सामना करण्याची आहे . धैर्याने म्हणजे हलगर्जीपणा नव्हे, तसेच म्हणजे संयम निष्काळजीपणाने नव्हे.

कोरोनाचे युद्ध जिंकण्यासाठी स्वतःमध्ये संयम असण्याची फार गरज आहे, जसे की मी सोशल डिस्टंसिंगचे पालन करेल, बाहेर जाताना मास्क लावेल ,माझे कुटुंब माझी जबाबदारीआहे , सार्वजनिक ठिकाणी जाताना मी मास्क काढणार नाही , वेळोवेळी हात स्वच्छ करेल, आवश्यक नसताना बाहेर पडणार नाही व धैर्याने म्हणजे घाबरून न जाता त्या संकटावर मात करणे.

कोरोना म्हटलं की समाज काय म्हणेल लोकं कुजबुज करतील का ? टेस्ट करायची की नाही असंख्य प्रश्न चालू होतात, कोरोनामुळे त्रास होण्याची भिती वाटतेय, मग दररोज हे करा:

टास्क फोर्सने सांगितलेले टेस्ट वॉक नेमके आहे याबद्दल जाणून घेऊया,त्यामुळे आपण फिट आहे की नाही हे आपल्याला कळेल.

🚶व्यक्तीने मास्क घालावा किंवा तोंडाला रुमाल बांधावा.

🚶 ही चाचणी करणाऱ्याची रक्तातील ऑक्सिजनची पातळी 94 टक्क्यांपेक्षा अधिक असावी. त्या व्यक्तिला धापा लागण्याचा त्रास नसावा आणि कोणताही आधार न घेता चालता यावं.

🚶संबंधित व्यक्तिला रुम किंवा हॉलमध्ये न थांबता 6 मिनिटं चालता यावं.

🚶 6 मिनिटे चालल्यानंतर पल्स ऑक्सिमीटरच्या सहाय्याने संबंधित व्यक्तीच्या रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण तपासावं.

👉 परीक्षण:

६ मिनिटे चालल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी 93 टक्क्यांच्या खाली गेली नसेल तर त्या व्यक्तीची प्रकृती चांगली असल्याचं मानलं जातं. जर त्या व्यक्तीच्या ऑक्सिजन पातळीत चालल्यानंतर 3 टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली तर डॉक्टरांनी संबंधित व्यक्तीला दाखल करुन घ्यावं. कारण या व्यक्तीला ऑक्सिजनची पातळी कमी होण्याचा त्रास जाणवू शकतो, असं मत वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.

त्यामुळेच अशा व्यक्तींना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवत कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होईल.
असे एका वृत्तवाहिनीने सांगितले आहे.

🙏 ही माहिती अत्यंत उपयुक्त आहे, तरी तुमचे मित्र मंडळी नातेवाईक जास्तीत जास्त शेअर करा…

👉 हे ही वाचा

1 . पिकांच्या जीवनक्रमामध्ये ‘ह्या’ घटकांचे महत्व; त्या घटकांची कमतरता, लक्षणे व त्यावर करा, अशा उपाययोजना…

2. संकटावर मात करत या गावाने रचला अंजीरात “नंबर वन ” होण्याचा मान!

3. कोणत्याही बँकेची मदत न घेता 70 वर्षीय श्री खर्डे यांनी शेतजोड व्यवसायातुन कमावले वर्षाकाठी 8 ते 9 लाख उत्पन्न…_
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button