कृषी सल्ला

सोयाबीन मधील तेजी अजूनही कायम! खरीप हंगामात कुठपर्यंत जाईल सोयाबीनचा दर पहा सविस्तर वृत्तान्त..

Soybean boom still in full swing! See the details of soybean prices in the kharif season.

मागील वर्षी सोयाबीन मधील तुटवडा प्रचंड होता. त्यामध्ये सोयाबीन मधील बियाणे याबाबत तक्रारी ही प्रचंड होत्या. सोयाबीनची मागणी आणि पुरवठा यात मोठी दरी निर्माण झालेली आहे. त्यामुळे सोयाबीन मधील तेजी अजूनही कायम आहे.

येत्या सहा महिन्यांमध्ये अजूनही तर वाढू शकतात असा तर्क आहे. नवीन सोयाबीन येण्यासाठी किमान सहा सात महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे ही तूट लगेच भरून निघणार नाही. तसेच आंतरराष्ट्रीय वायदेबाजार सोयाबीन ला आधार मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन मध्ये आणखीन तेजी येण्याचे संकेत देखील आहेत.

सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री चालू केली आहे. मात्र बाजारातील तेजी पाहून अद्यापही अनेक शेतकरी विक्रीसाठी थांबले आहेत. बाजारात सोयाबीनची आवक कमी आहे. मागणी व पुरवठा यांच्यात दरी निर्माण झाल्यामुळे तिची वाढत असल्याचे सांगितले जात आहे. देशात नव्या पिकाची आवक ही ऑक्टोबर महिन्यापर्यंत होईल असे वाटत नाहीत्यामुळे सोयाबीन चा तुटवडा मोठा जाणवेल हे निश्चित आहे.

हंगामामध्ये सोयाबीनचा दर सहा हजार रुपये पर्यंत पोहोचू शकतो असा अंदाज लावला जात आहे.यंदाच्या हंगामात दर सहा हजार चारशे ते सहा हजार आठशे रुपये पर्यंत जाऊ शकतो असे काही बाजार विश्लेषक यांचे म्हणणे आहे.

👇 खाली क्लिक करा

1 उन्हाळ्यात फळबागेची ‘ घ्या’ अशी काळजी व करा या उपाययोजना

2 जमिनीतील उपलब्ध ओलावा जास्त काळ टिकण्यासाठी आच्छादनाचा कसा उपयोग करावा.

3 पिकांच्या जीवनक्रमामध्ये ‘ह्या’ घटकांचे महत्व; त्या घटकांची कमतरता, लक्षणे व त्यावर करा, अशा उपाययोजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button