ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Update | राज्यात पावसाची शक्यता, थंडी ओसरली जाणून घ्या काय कारण सविस्तर …

Weather Update | Know the possibility of rain in the state, the cold has subsided, the reason is detailed...

Weather Update | राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ६) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. (Weather Update) तर किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने, शुक्रवारी (ता. ५) राजस्थानमधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी २.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. पंजाब, हरियाना, चंडीगड, राजस्थान, उत्तर प्रदेशमध्ये तीव्र थंडीच्या लाटेबरोबरच दाट धुके पसरल्याचे चित्र आहे. उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील थंडी ओसरली असून, शुक्रवारी (ता. ५) निफाड येथील गहू संशोधन केंद्र व गोंदिया येथे राज्यातील नीचांकी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात किमान तापमान १४ ते २० अंशांच्या दरम्यान आहे. आज (ता. ६) राज्याच्या किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता कायम आहे.

वाचा : Milk Subsidy | आनंदाची बातमी ! महाराष्ट्र सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 5 रुपयांचे अनुदान

लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यापासून उत्तर कोकणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण गुजरातपासून राजस्थान मधील चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ६) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे.

विजांसह पावसाची शक्यता असलेल्या ठिकाणांची यादी खालीलप्रमाणे आहे :

  • जळगाव
  • नाशिक
  • नगर
  • पुणे
  • कोल्हापूर
  • छत्रपती संभाजीनगर

Web Title | Weather Update | Know the possibility of rain in the state, the cold has subsided, the reason is detailed…

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button