ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Rain Forecast | शेतकऱ्यांनो महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांत वारे अन् विजांसह होणार पाऊस

Farmers warned of heavy rain in Maharashtra; There will be rain with wind and lightning in these districts

Rain Forecast | राज्यात पावसाची स्थिती अजूनही अस्थिर आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आज (ता. १०) जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता आहे. तर रायगड, पुणे जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. बुधवारी (ता. ८) कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, बीड, मुंबईसह कोकणात हलक्या ते जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. गुरुवारी (ता. ९) पहाटे सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या.

कसे आहे तापमान?
पूर्व-मध्य अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र निवळून गेले आहे. या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यातच पावसाला पोषक हवामान आणि ढगाळ आकाशामुळे राज्याच्या कमाल-किमान तापमानात चढ-उतार सुरूच असून उकाडा कायम आहे. गुरुवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये डहाणू येथे उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस, उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान ३० ते ३५ अंशाच्या दरम्यान आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी काहीशी कमी झाली आहे.

वाचा : Indian Postal Department | भारतीय टपाल विभागात बंपर भरती! 1899 पदांसाठी आजपासून अर्ज करा, नक्की वाचा

कोठे आहे पावसाचा अंदाज?
मात्र पहाटेच्या वेळी काहीसा गारठा आणि धुक्याची दुलई पाहायला मिळत आहे. गुरुवारी (ता. ९) जळगाव येथे राज्यातील नीचांकी १४.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज (ता. १०) दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम आहे. तर रायगड, पुणे जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे. या पावसामुळे शेतीला चांगले पोषक वातावरण मिळेल. तसेच,

हेही वाचा

Web Title: Farmers warned of heavy rain in Maharashtra; There will be rain with wind and lightning in these districts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button