lang="en-US"> Weather News | राज्यात ‘या’ ठिकाणी शनिवारी आणि रविवारी विजांसह पावसाचा अंदाज, तर उन्हाचा ताप राहणार कायम

Weather News | राज्यात ‘या’ ठिकाणी शनिवारी आणि रविवारी विजांसह पावसाचा अंदाज, तर उन्हाचा ताप राहणार कायम

Weather News | हवामान विभागाने राज्यात आज आणि उद्या उन्हाचा ताप कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, शनिवारी आणि रविवारी राज्यातील अनेक भागात पावसाची (Weather News) शक्यता आहे.

खानदेश, नाशिक आणि मराठवाड्यात येलो अलर्ट
हवामान विभागाने खानदेशातील धुळे, नंदूरबार आणि जळगाव तसेच नाशिक, सोलापूर आणि मराठवाड्यातील लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. या भागात ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज आहे.

वाचा| Soyabean Rates | सोयाबीन बाजारात मंदी! शेतकऱ्यांनो जाणून घ्या नेमकं कारण काय? वाचा दराचं पुढचं भविष्य…

इतर भागांमध्ये हलक्या सरी
सांगली, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

रविवारी पावसाची तीव्रता वाढणार
रविवारी राज्यात पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोकणातील पालघर आणि ठाणे, खानदेशातील धुळे, नंदूरबार आणि जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या सरी पडतील.

शेतकऱ्यांसाठी सल्ला
हवामान विभागाने शेतकऱ्यांना पावसाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, नागरिकांनाही पावसाच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा

Exit mobile version