lang="en-US"> Weather News | आगामी मान्सून सर्वसाधारण की कसा राहणार? जाणून घ्या महत्वाची हवामान बातमी..

Weather News | आगामी मान्सून सर्वसाधारण की कसा राहणार? जाणून घ्या महत्वाची हवामान बातमी..

Weather News | How will the upcoming monsoon be general? Know important weather news..

Weather News | आगामी मान्सून हंगामात पाऊस सर्वसाधारण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव येत्या दोन महिन्यात कमी होण्याची शक्यता आहे. (Weather News ) यामुळे मान्सूनच्या पावसावर सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेल्या अंदाजानुसार, देशात जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात दीर्घकालीन सरासरीच्या ९९ टक्के पावसाची शक्यता आहे. यामध्ये पाऊस सर्वसाधारण राहण्याची शक्यता ४० टक्के, कमी पाऊस पडण्याची शक्यता १४ टक्के आणि जास्त पाऊस पडण्याची शक्यता ४६ टक्के आहे.

गेल्या वर्षी एल निनोचा परिणाम मान्सूनच्या पावसावर झाला होता. त्यामुळे देशात सरासरीच्या ९४ टक्के पाऊस पडला होता. महाराष्ट्रातही सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडला होता. मात्र, सांगली, सातारा, सोलापूर, बीड, धाराशिव, हिंगोली, जालना, अकोला आणि अमरावती या नऊ जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस पडला होता.

वाचा : Irrigation App | या जिल्ह्यात सिंचन विहिरीसाठी मोबाईल ॲपद्वारे प्रस्ताव सादर करण्याची सुविधा, पहा ते ॲप कोणते..

एल निनोचा प्रभाव कमी झाल्यामुळे यंदा मान्सूनचा पाऊस सर्वसाधारण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्याची मागणी पूर्ण होण्यास मदत होईल.

हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांच्यानुसार, एप्रिल ते जून महिन्यात प्रशांत महासागराचे तापमान न्यूट्रल होण्याची शक्यता ७३ टक्के आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात प्रशांत महासागराचे तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्या भागात ला निना निर्माण होण्याची शक्यता ५० ते ६० टक्के आहे. ला निना आल्यास मान्सून काळात सर्वसाधारण ते सरासरीहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Web Title | Weather News | How will the upcoming monsoon be general? Know important weather news..

हेही वाचा

Exit mobile version