हवामान

Weather News | चार-पाच दिवस पावसाच्या धुमाकूळी नंतर पावसाचा वेग मंदावला; पहा काय असेल पुढील पावसाचा अंदाज?

After four or five days of torrential downpours, the rains slowed down; See what the next rain forecast will be?

महाराष्ट्र राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर त्याचा प्रभाव आता कमी होणार आहे. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्‍यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ काही भागात चक्रीय वाऱ्यांची स्थिती सरकली. कर्नाटकाच्या किनारपट्टी भागात या स्थितीचा प्रभाव अधिक प्रमाणात होता. तसेच मध्य प्रदेशाच्या आग्नेय भागात चक्रीय स्थिती असून समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर होती. त्यामुळे राज्यातील पूर्व मोसमी पावसाचे प्रमाण कमी होण्यास सुरुवात झालेली आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर मराठवाडा, बुलढाणा, चंद्रपूर या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याचे प्रमाण राहील.

ढगाळ वातावरणामुळे किमान व कमाल तापमान मध्ये चांगलीच घट झाली आहे.दिवसभर काही अंशी कोरडे हवामान असेल तर दुपारनंतर वातावरणातील बदलामुळे तापमानात चढ-उतार होत राहतील.

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button