ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

स्वस्त धान्य दुकान टाकायचं आहे का? दुकानाच्या परवान्यासाठी महत्वपूर्ण अपडेट..

Want to drop off a cheap grain store? Important update for shop license ..

राज्यातील तीन जिल्यांमधील रिक्त असलेल्या त्याचप्रमाणे नवीन स्वस्त धान्य दुकानाच्या परवान्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले होते. परभणी जिल्ह्यासाठी 10 सप्टेंबर, नंदुरबार जिल्यातील 13 सप्टेंबर आणि अहमदनगर जिल्यासाठी 21 सप्टेंबर पर्यंत अर्ज दाखल करू शकता. या अर्जासाठी काढण्यात आलेली जाहिरात यासाठी लागणारे कागदपत्रे आणि अर्जाचे नमुने सविस्तर पाहूया.

पहिली जाहिरात परभणी जिल्हा :

परभणी जिल्याची जाहिरात 10 ऑगस्ट 2021 पासून 10 सप्टेंबर 2021 या कालावधीत अर्ज मागवण्यात आलेले आहेत. परभणी जिल्यामधील परभणी शहर त्याचप्रमाणे परभणी ग्रामीण, जिंतूर शहर, जिंतूर ग्रामीण, सेलू तालुक्यामधील सेलू शहर आणि ग्रामीण, पालम मधील ग्रामीण, पूर्णा ग्रामीण , गंगाखेड ग्रामीण, पाथरी शहर याचप्रमाणे मानवत शहर ग्रामीण आणि सोनपेठ ग्रामीण. असे एकूण 44 गावांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. सबांधित गावातील जे काही इच्छुक लाभार्थी असतील यांनी संबंधित गावातील तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये 10 सप्टेंबर 2021 पर्यंत अर्ज जमा करावे.

अर्ज करिता फॉर्म डाउनलोड करा करा..

दुसरी जाहिरात नंदुरबार जिल्ह्यासाठी:

नंदुरबार जिल्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 13 सप्टेंबर 2021 आहे. यामध्ये आपण पाहू शकतो नंदुरबार जिल्यामधील नंदुरबार नवापूर,अक्कलकुवा, तळोदा,अक्राणी आणि शहादा या तालुक्यामधील एकूण 41 जागांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. 13 सप्टेंबर 2021 पर्यंत संबंधित गावाच्या तालुका तहसील कार्यालयामध्ये अर्ज जमा करायचे आहेत.

अर्ज करिता फॉर्म डाउनलोड करा करा..

वाचा: PM Kisan चे 2000 रुपये मिळाले नाहीय? ‘या’ क्रमांकांवर नोंदवा तक्रार

तिसरी जाहिरात अहमदनगर जिल्ह्यासाठी:

अहमदनगर जिल्यामधील ग्रामीण भागातील 111 रिक्त असलेल्या स्वस्त धान्य दुकानाच्या परवान्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. यामध्ये अर्ज करण्यासाठी.

अर्ज करिता फॉर्म डाउनलोड करा करा..

पात्रता-
1) ग्रामपंचायत (पंचायत) किंवा तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था हे याठिकाणी अर्ज करू शकणार आहेत.
2) नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट.
3) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था.
4) संस्थानोंदणी अधिनियमांतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक किंवा सार्वजनिक न्यास.

अशा प्रकारे संस्था ग्रामपंचायत या रिक्त असलेल्या नवीन स्वस्त दुकानांमध्ये अर्ज करू शकतील.

वाचा: इंधन बचतीचा महामंत्र; वापरा ट्रॅक्टर निवडीचे हे तंत्र..

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:

1) गटाच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत ( ग्राम पंचायत असल्यास ठरावाची किंवा इतिवृत्तांताची प्रत)
2) गटातील सर्व सदस्यांची नावे नमूद असलेल्या सक्षम प्राधिकारी यांची स्वाक्षरी असलेल्या प्रताची प्रत.
3) गटातील प्रमुख व इतर सर्व सदस्यांच्या आधारकार्डची प्रत .
4) व्यवसायाच्या जागेचा ग्रामपंचायत 8अ/ पी.आर कार्डचा पुरावा.
5) गट सुरू झाल्यापासून अर्जाच्या दिनांकापर्यंतची बँकेच्या पासबुकची प्रत.
6) गटातील सदस्यांना अंतर्गत कर्जव्यवहाराबाबत कागदपत्राची प्रत.
7) सनदी लेखापाल यांचे लेखापरिक्षणाबाबत मागील 3 वर्षाचे तक्ते.
8) सोबतच्या नमुन्यातील 100 रु. च्या बॉडपेपरवरील गुन्हा दाखल नसल्याबाबत प्रमाणपत्र.
9) याचप्रमाणे 75 रुपयांचे चलनाची प्रत आणि व्यवसायाच्या जागेबाबत भाडेपावती व संमतीपत्र.
10) जर जागा भाड्याने असल्यास आणि ग्रामपंचायत अर्जदार असल्यास ग्रामपंचायत ठरावाची चालू वर्षामधील प्रत अशा प्रकारचे कागदपत्रे या अर्जासोबत जोडायचे आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button