ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
इतर

जनधन खाता उघडलं होतं, मात्र पुढे व्यवहार केला नाही! आता काय करायचे?

Jandhan account was opened, but no further transaction! What to do now

प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत अनेक जणांनी विविध बँकेत जनधन खाते उघडले होते. मात्र पुढे कोणताच व्यवहार केला नाही आता मात्र केवळ एक मिस कॉल देऊन तुम्हाला तुमच्या अकाउंट विषयी माहिती मिळणार आहे .यासाठी तुमचे आधार कार्ड बँक खाते सोबत जोडणे गरजेचे आहे. 18004253800 किंवा 1800112211 या क्रमांकावर मिस कॉल देऊन तुम्ही जनधन खात्याचा बॅलन्स जाणून घेऊ शकता. मात्र, त्यासाठी तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर्ड असला पाहिजे.

पंतप्रधान जनधन योजना अंतर्गत ग्राहकांना अनेक सुविधा दिल्या जातात. जनधन खाते झिरो बॅलन्स वर उघडता येतो, याशिवाय ओव्हर ड्राफ्ट आणि रूपे कार्डची सुविधाही यात असते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेनुसार देशातील नागरिकांची बँकांमध्ये जनधन खाती उघडण्यात आली होती. बँक सुविधांपासून वंचित असलेल्यांना प्राधान्याने ही खाती उघडून देण्यात आली. मात्र या खात्यांमध्ये कोणताही व्यवहार न झाल्याने निष्क्रिय खात्यांची विक्रमी नोंद झाली आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या नियमानुसार जर एखाद्या खात्यात सलग दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त दिवस कोणताही जमाखर्चाचा व्यवहार झाला नाही तर ते खातं निष्क्रिय होते.

जवळपास पाच कोटी 82 लाख जनधन खाते निष्क्रिय आहे असं समोर आला आहे यामुळे सरकारकडून मिळणाऱ्या विविध योजनांचे पैसे, ग्रामीण रोजगार हमी चे पैसे लाभार्थ्यांना मिळत नाही. हा लाभ घेण्यासाठी आपले निष्क्रिय बँक खाते एक फॉर्म भरून द्यावा लागेल. हा फॉर्म भरून दिल्यानंतर आपले खाते परत कार्यान्वित होईल आणि शासकीय योजनांचा लाभ आपल्याला घेता येईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button