ताज्या बातम्या

Voter ID Card | मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणं बंधनकारक नाही! वाचा सविस्तर माहिती!

Voter ID Card | It is not mandatory to add Aadhaar card to voter ID! Read the detailed information!

Voter ID Card | मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करणे अद्याप बंधनकारक करण्यात आलेले नाही. सरकारने यासाठी कोणतेही लक्ष्य किंवा मुदत अद्याप ठरवलेली नाही.

कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शुक्रवारी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना हे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, सध्या आधार-पॅन लिंक करण्याची प्रक्रिया चालू आहे. (Voter ID Card) मतदार ओळखपत्रासोबत आधार कार्ड लिंक करण्याचं कोणतंही लक्ष्य अद्याप देण्यात आलेलं नाही.

मेघवाल यांनी सांगितले की, भारताच्या निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे की, EPIC शी आधार लिंक करणे अद्याप सुरू झालेलं नाही. याशिवाय फॉर्म 6B जमा करण्याची मुदत एक वर्षाने वाढवण्यात आली आहे.

मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक नाही. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करू शकता.

वाचा : E-Ration Card | या जिल्ह्यात धान्य मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोयीस्कर करण्यासाठी ई-शिधापत्रिकांचा शुभारंभ!

जर तुम्हाला मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करायचा असल्यास, तुम्हाला फॉर्म 6B सबमिट करावा लागेल, ज्याची अंतिम मुदत मार्च 2024 अखेरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, आधार कार्डमधील माहिती दुरुस्त करण्याची अंतिम मुदत 14 डिसेंबर आहे. या तारखेनंतर UIDAI आधारमध्ये कोणतीही माहिती अपडेट किंवा बदल करण्यासाठी शुल्क आकारेल.

मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करण्याचे फायदे

मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे मतदार यादीतील नावांची पुनरावृत्ती कमी होईल. तसेच, मतदानाचा अधिकार मिळविण्यासाठी फसवणूक होण्याची शक्यता कमी होईल.

आधार लिंक केल्याने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसेच, मतदान प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल.

मतदारांना काय करावे?

जर तुम्हाला मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करायचा असेल तर तुम्ही खालील गोष्टी करू शकता:

  • NVSP पोर्टलवर जा आणि लॉग इन करा.
  • “आधार लिंक” पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा.
  • आवश्यक असल्यास इतर माहिती भरा.
  • सबमिट करा.

तुम्ही तुमच्या स्थानिक मतदान केंद्रावर जाऊन देखील आधार लिंक करू शकता.

Web Title : Voter ID Card | It is not mandatory to add Aadhaar card to voter ID! Read the detailed information!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button