ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Wheat Rate | गव्हाच्या किंमती वाढू नये म्हणून सरकानेच घेतला मोठा निर्णय; शेतकऱ्यांनो तुम्हीच पाहा नेमकं प्रकरण…

Wheat Rate | Sarka itself took a big decision to prevent wheat prices from increasing; Farmers, you see the actual case…

Wheat Rate | देशात लोकसभा निवडणुकीची रणधुरी सुरु असतानाच महागाईचा डोकं दुखवणारा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना राबवल्या आहेत. यातच आता गव्हाच्या वाढत्या किंमतीवर (Wheat Rate) नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने कठोर पाऊल उचलले आहे.

गव्हाच्या साठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी सरकारने सर्व व्यापारी आणि मिलर्सना त्यांच्याकडे असलेला गव्हाचा साठा ३१ मार्चपर्यंत जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही सरकारने दिला आहे.

गव्हाची साठवणूक मर्यादा ३१ मार्चला संपत आहे. यानंतर गव्हाचा साठा वाढून त्याचे परिणाम बाजारपेठेवर होण्याची शक्यता आहे. अशावेळी सरकारने वेळीच खबरदारी घेतली आहे. यामुळे गव्हाच्या किंमती नियंत्रणात राहण्यास मदत होईल आणि ग्राहकांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.

वाचा|Free Electricity | एक कोटी कुटुंबांना महिन्याला मिळणार वीज मोफत, ‘पंतप्रधान सूर्य घर योजना’ जाणून लगेच करा अर्ज

याबाबत ग्राहक व्यवहार आणि अन्न पुरवठा मंत्रालयाने एक परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार, सर्व व्यापारी आणि मिलर्सना ३१ मार्चपर्यंत त्यांच्याकडे असलेला गव्हाचा साठा पोर्टलवर जाहीर करणे बंधनकारक आहे. यात साठवणुकीचे ठिकाण, साठवलेल्या गव्हाचा प्रकार आणि प्रमाण याची माहिती द्यावी लागेल.

या निर्णयामुळे बाजारपेठेतील गव्हाच्या उपलब्धतेची माहिती सरकारला मिळेल आणि त्यानुसार पुरवठा साखळी व्यवस्थितपणे राबवता येईल. तसेच, कृत्रिम टंचाई निर्माण करून गव्हाच्या किंमती वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर अंकुश येईल अशी अपेक्षा आहे.

या निर्णयामुळे गव्हाच्या किंमती नियंत्रणात राहण्यास मदत होईल आणि ग्राहकांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.

Web Title |Wheat Rate | Sarka itself took a big decision to prevent wheat prices from increasing; Farmers, you see the actual case…

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button