Monsoon Update | हवामान विभागाकडून पावसाची अपडेट! शेतकऱ्यांनो आज ‘या’ पाच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी
Rain Update from Meteorological Department! Farmers today, yellow alert of rain has been issued in these five districts
Monsoon Update | महाराष्ट्रात मॉन्सूनचा परतीचा प्रवास थांबला असला तरी, राज्यातील काही भागात उद्या हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागानुसार, उद्या सिंधुदूर्ग, रत्नागिरी, नाशिक, धुळे आणि नंदूरबार या पाच जिल्ह्यांमध्ये विजा, ढगांच्या गडगडाटासह आणि वेगवान वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
पावसाचा अंदाज
यासोबतच कोल्हापूर, सातारा, रायगड, पालघर आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. राज्यातील उर्वरित भागात आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
वाचा : Return Monsoon | शेतकऱ्यांनो राज्यात परतीचा पाऊस कुठपर्यंत पोहोचला? जाणून घ्या पुढचे पाच दिवसाचे हवामान अपडेट
अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण
मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार सुरू होती. यामुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच, काही ठिकाणी घरांची पडझड झाली होती. हवामान विभागाने नागरिकांना पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा :
Web Title: Rain Update from Meteorological Department! Farmers today, yellow alert of rain has been issued in these five districts