हवामान

Return Monsoon | शेतकऱ्यांनो राज्यात परतीचा पाऊस कुठपर्यंत पोहोचला? जाणून घ्या पुढचे पाच दिवसाचे हवामान अपडेट

Farmers, how far has the rain returned to the state? Know next five days weather update

Return Monsoon | मान्सूनचा परतीचा प्रवास गेल्या दोन दिवसांपासून थांबला आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान नसल्याने वाटचाल थबकली आहे. देशात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. पण महाराष्ट्रात उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. मान्सूनचा (Return Monsoon) परतीचा प्रवास सोमवारी देशातील काही भागांमधून काढता पाय घेतला होता. सोमवारी पूर्व उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशच्या सर्व भागातून मान्सून परतला होता. तर बिहारचा आणखी काही भाग, झारखंड, छत्तसगड, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटकच्या आणखी भागातून मान्सूनने माघार घेतली होती. तर महाराष्ट्राच्या बहुतांशी भागातून मान्सून परतला.

हवामान नसल्याने मान्सूनची वाटचाल थांबली
मात्र, मागील दोन दिवसांत मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान नसल्याने मान्सूनची वाटचाल थांबली आहे. सध्या मान्सून कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्याचा काही भाग आणि विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याचा काही भागात आहे. माॅन्सूनच्या परतीची सिमा दौलतगंज, कांकेर, रामागुंडम, बिजापूर आणि वेंगुर्ला या भागात कायम आहे. देशातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडत आहेत. अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, आसाम, मेघालय आणि हिमालयाच्या शेजारच्या भागात पाऊस पडत आहे.

वाचा : Weather Update | राज्यात परतीच्या पावसाचा प्रवास सुरू! ‘या’ तारखेपासून मान्सून बाय-बाय करणारं; जाणून घ्या आताची पावसाची स्थिती

राज्यात पुढचे पाच दिवसाचे अपडेट
राज्यात मात्र उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. राज्यात सकाळ पासूनच उन्हाची ताप वाढत आहे. तर रात्री काही प्रमाणात गारवा जाणवतो. दुपारी उन्हाचा चटका असह्य होत आहे. राज्याच्या बहुतांशी भागात तापमानात वाढ झाली आहे. यामुळे पिकांना सिंचन करण्याची वेळ आल्याचे शेतकरी सांगत आहेत. हवामान विभागाने जाहीर केल्यानुसार, राज्यात पुढील पाच दिवस हवामान उष्ण आणि कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा :

Web Title: Farmers, how far has the rain returned to the state? Know next five days weather update

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button