Ghatasthapana Muhurta | कधी आहे घटस्थापनेचा मुहूर्त? महत्वाचे दिवस कोणते? सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
When is the time of Ghatsthalpan? And what are the important days? Know all information in one click
Ghatasthapana Muhurta | गणेशोत्सवानंतर आता आनंदाने, उत्साहाने नवरात्रौत्सव साजरा होणार असून, सगळीकडे चैतन्याची लहर पाहायला मिळत आहे. यंदा नवरात्रौत्सव 15 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत रंगणार आहे. यावर्षी रविवारी (दि. 15) घटस्थापना होऊन नवरात्रौरंभ होत आहे.
घटस्थापना ब्राह्ममुहूर्तावर
दाते पंचागाचे मोहन दाते यांनी सांगितले की, रविवारी (दि. 15) चित्रा, नक्षत्र, वैधृती योग असला तरी हे कर्म तिथी प्रधान असल्याने रविवारी ब्राह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे पाचपासून ते दुपारी 1 वाजून 45 मिनिटांपर्यंत कोणत्याही वेळी घटस्थापना करून नवरात्रातील पूजन करता येईल.
नवरात्रातील महत्त्वाचे दिवस
15 ऑक्टोबर – घटस्थापना
19 ऑक्टोबर – ललित पंचमी
21 ऑक्टोबर – महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे)
22 ऑक्टोबर – दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास
23 ऑक्टोबर – नवरात्रोत्थापना
24 ऑक्टोबर – विजयादशमी (दसरा)
दसरा 24 ऑक्टोबर रोजी
वाचा : Navratri 2023 | घटस्थापना का केली जाते? घटस्थापनेचे शेतीसाठी महत्त्व काय आहे? सर्व माहिती जाणून घ्या सविस्तर
दाते म्हणाले की, महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी 21 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मिळते, त्यामुळे त्यादिवशी महालक्ष्मी पूजन दिलेले आहे. मात्र, दुर्गाष्टमी 22 ऑक्टोबर रोजी आहे. विजयादशमी, दसरा, सीमोल्लंघन हे 24 ऑक्टोबर रोजी असून, साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. यादिवशी विजय मुहुर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहुर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी 2 वाजून 18 मिनिटे ते 3 वाजून 04 मिनिटांदरम्यान आहे.
सणांच्या सुमारास तारखेविषयी संभ्रम टाळा
दाते यांनी सांगितले की, काही लोकांकडून वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर सणांच्या सुमारास तारखेविषयी संभ्रम निर्माण करणारे मेसेज पाठविले जातात. त्याकडे दुर्लक्ष करावे आणि दसरा 24 ऑक्टोबर रोजी साजरा करावा.
हेही वाचा :
Web Title: When is the time of Ghatsthalpan? And what are the important days? Know all information in one click