ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Sugarcane FRP | एफआरपी न देणारे कारखाने अडचणीत! मालमत्ता जप्तीची कारवाई सुरू ; पण शेतकऱ्यांचे पैसे थकविले, वाचा सविस्तर …

Sugarcane FRP | Factories that do not give FRP in trouble! Asset confiscation action started; But farmers' money is exhausted, read in detail...

Sugarcane FRP | राज्यातील यंदाचा ऊस गाळप हंगाम आठ दिवसांवर आला असताना, राज्यातील २६ साखर कारखान्यांनी गेल्या आणि त्यापूर्वीच्या हंगामातील उसाच्या एफआरपीचे शेतकऱ्यांचे सुमारे ३४५ कोटी रुपये थकविले आहेत.(Sugarcane FRP) या कारखान्यांविरोधात मालमत्ता जप्त करुन शेतकऱ्यांना पैसे देण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे.

राज्यात गेल्या हंगामात २११ साखर कारखान्यांनी १०५३.९१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून १०५.४० लाख मेट्रिक टन साखर उत्पादन केले. या उसापोटी शेतकऱ्यांना ३५ हजार ५३२ कोटींची एफआरपी मिळणे अपेक्षित असताना, वर्षभरानंतरही २६ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे दिले नसल्याची बाब समोर आली आहे.

या कारखान्यांचा समावेश

या कारखान्यांमध्ये राजगड सहकारी (भोर), अजिंक्यतारा (सातारा), ग्रीन पॉवर शुगर (सातारा), पांडुरंग सहकारी (माळशिरस), मकाई (करमाळा), वसंतराव काळे (पंढरपूर), विट्ठलसाई सहकारी (उमरगा), अगस्ती (अकोले), बापूसाहेब थोरात (संगमनेर), सातपुडा-तापी सहकारी (शहादा), श्रद्धा एनर्जी (जालना), समृद्धी शुगर (जालना), भाऊराव चव्हाण (हिंगोली), टोकाई (हिंगोली), भाऊराव चव्हाण (नांदेड) यांचा समावेश आहे.

वाचा : मोठी बातमी, उसाच्या एफआरपी मध्ये करण्यात आली वाढ ; मोदी कॅबिनेटची घोषणा – वाचा सविस्तर

साखर आयुक्तांनी या कारखान्यांविरोधात आरआरसी (मालमत्ता जप्त करुन शेतकऱ्यांना पैसे देण्याची) कारवाई सुरु केली आहे. या कारवाईमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उसाच्या पैशाची गरज असल्यास ते कारखान्याच्या मालमत्तेवर कर्ज घेऊ शकतील.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या कारवाईवर समाधान व्यक्त केले आहे. मात्र, या कारवाईमध्ये राजकीय दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

हेही वाचा :

Web Title : Sugarcane FRP | Factories that do not give FRP in trouble! Asset confiscation action started; But farmers’ money is exhausted, read in detail…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button