कृषी बातम्या

मोठी बातमी, उसाच्या एफआरपी मध्ये करण्यात आली वाढ ; मोदी कॅबिनेटची घोषणा – वाचा सविस्तर

The big news, was the increase in sugarcane FRP; Modi cabinet announcement - read more

आता शेतकऱ्यांचे चांगले दिवस येणार शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उसाचा रास्त व किफायतशीर दर (FRP) वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मोदी मंत्रिमंडळ आणि सीसीईएच्या बैठकीत 5 रुपये प्रति किंटल उसाची एफआरपी वाढवण्यात आली आहे. या निर्णयाने शेतकऱ्याला थोडा दिलासा मिळणार आहे.
याविषयी अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊया..

हे ही वाचा : पीएम किसान योजनेत तब्बल 42 लाख अपात्र लाभार्थ्यांनी, काय होणार यांच्यावर कारवाई? वाचा सविस्तर बातमी…

एफआरपी वाढवताना या गोष्टींचा विचार केला जातो-

उसाच्या उत्पादनाचा खर्च. पिकापासून उत्पादकांना परतावा ग्राहकांना रास्त भावात साखरेची उपलब्धता. उसापासून बनविण्यात आलेल्या साखरेची ऊस उत्पादकांद्वारे विक्रीची किंमत. उसापासून साखरेची पुनर्रप्राप्ती. उसउत्पादने जसे की, काकवी, उसाची चिपाडे, गाळ या विक्रीपासून चे उत्पन्न.

एफआरपी म्हणजे रास्त आणि किफायतशीर दर ज्यावर साखर कारखान्यांना शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करावा लागतो. जसा दर वाढेल तसा शेतकऱ्यांचा अधिक फायदा.

हे ही वाचा : पीएम किसान योजनेत तब्बल 42 लाख अपात्र लाभार्थ्यांनी, काय होणार यांच्यावर कारवाई? वाचा सविस्तर बातमी…

एफआरपी कमिशन ऑफ एग्रीकल्चरल कॉस्ट अँड प्रायसेज (CACP) दरवर्षी सीएसीपी उसासह प्रमुख कृषी उत्पादनांच्या किमतींबाबत सरकारला शिफारशी पाठवतात त्यावर विचार केल्यानंतर सरकार त्याची अंमलबजावणी करते. ही अशी प्रोसेस चालू असते. सरकारने अंमलबजावणी केल्यावर शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या फायद्याच्या सुविधा निर्णय पोहचले जातात. तसेच आजच्या बैठकीत 10% वसुलीच्या आधारावर उसाचा रास्त व किफायतशीर दर (FRP) 290 रुपये प्रति क्विंटल करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी एफआरपीमध्ये 10 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आलेली, आता एफआरपी प्रति क्विंटल 5 रुपयांनी वाढल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता उसाची एफआरपी 290 रुपये प्रति क्विंटल झाल्याचे दिसत आहे.

बैठकीत 5 रुपये प्रति क्विंटल वाढवण्याचा प्रस्ताव मांडला होता या प्रस्तावाला अखेर मोदी कॅबिनेटनं मंजुरी दिलेली आहे. एफआरपी वाढल्याने साखरेचा एमएसपी आणि इथेनॉलची किंमत वाढवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे शेतकऱ्यांबरोबर साखर कारखान्यांना फायदा होणार असल्याचे दिसत आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button