lang="en-US"> Sugar Wheat Price | निवडणुकीच्या काळात महागणार का साखर आणि गहू? शेतकऱ्यांनो जाणून घ्या महत्वाची माहिती

Sugar Wheat Price | निवडणुकीच्या काळात महागणार का साखर आणि गहू? शेतकऱ्यांनो जाणून घ्या महत्वाची माहिती

Sugar Wheat Price | देशात लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. यामुळे राजकीय वातावरण गरम झाले असतानाच, सरकारने निवडणुकीच्या काळात वस्तूंच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. महागाई वाढू नये आणि सर्वसामान्य जनतेला फटका बसू नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यातच साखर आणि गव्हाच्या किंमतीत वाढ (Sugar Wheat Price) होऊ नये यासाठी सरकारने उपाययोजना केल्या आहेत.

गहू आणि साखरेचा साठा जाहीर करण्याच्या सूचना:
व्यापाऱ्यांनी गहू आणि साखरेचा साठा जाहीर करणे बंधनकारक आहे. साखर कारखान्यांना प्रमाणापेक्षा जास्त साखरेची विक्री केल्याबद्दल 25% कोट्यात कपात. अशा प्रकारे, सरकार साखर आणि गव्हाच्या किंमतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.

वाचा| Soyabean Rates | सोयाबीन बाजारात मंदी! शेतकऱ्यांनो जाणून घ्या नेमकं कारण काय? वाचा दराचं पुढचं भविष्य…

कांद्यावर निर्यातबंदी:
देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे कांद्याचा दर 4000 रुपयांवरून 800 ते 1200 रुपयांपर्यंत खाली आला आहे. मात्र, या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

गहू आणि तांदळावरही निर्यातबंदी:
गहू आणि तांदळाच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने या वस्तूंवरही निर्यातबंदी लागू केली आहे. यामुळे बाजारात गहू आणि तांदळाची उपलब्धता वाढली आहे आणि किंमतीही नियंत्रित राहिल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळणं कठीण होत आहे.

वाचा

Exit mobile version