ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

MSEDCL Decision | महावितरणकडून शेतकऱ्यांना लेखी पत्र, नूकसान झाल्यास शेतकऱ्यांना दिली जाणार नुकसान भरपाई देणार..

MSEDCL Decision | Written letter from MSEDCL to farmers, in case of loss, compensation will be given to farmers.

MSEDCL Decision | कृषी पंपासाठी लागणारा विद्युत पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांना (farmers) मोर्चे काढावे लागत असताना आपल्याला पाहायला मिळते. विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांना (farmers) अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आर्थिक नुकसान होते. याला पर्याय म्हणून महावितरणने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास भरपाई देणार असे सांगितले.

वाचा –तुरीच्या दरात चांगली वाढ, या बाजार समितीत तुरीला मिळाला इतका दर…

महावितरणने दिलं लेख पत्र –

वैजापूर कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना (farmers) महावितरण आर्थिक मदत करणार आहे. शेतकऱ्यांचे महावीतरणमुळे नुकसान झाल्यास महावितरण नुकसान भरपाई देणार आहे. महावितरण कडून दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले आहे की, शेतकऱ्यांना 24 तास विद्युत पुरवठा पुरवला जाणार आहे. तसेच जर रोहित्रामध्ये काही बिघाड झाल्यास महावितरण 48 तासांमध्ये दुरुस्त करून देणार आहे. 48 तासांचा आत नाही दिल्यास प्रत्येक ग्राहकाला 50 रुपये दिले जाणार आहेत. तसेच विद्युत पुरवठा थांबल्यास प्रत्येकी 50 रुपये दिले जाणार. असे कन्नड तालुक्यातील मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांना (farmers) दिलेल्या कार्यकारी अभियंता दौड यांनी पत्रात नमूद केले आहे.

वाचा –जनावरांवर पिसवांचा प्रादुर्भाव होतोय? पशुपालकांनो, त्वरित करा हे उपाय…

पत्रानुसार नाही समस्या सोडविल्या तर पुन्हा आंदोलन होणार –

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन, महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्या दरम्यान कार्यकारी अभियंता दौड यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवू व नुकसान भरपाई देखील दिली जाणार असे महावितरणच्या लेखी पत्राद्वारे सांगितले होते. जर बोलल्या प्रमाणे नुकसान भरपाई न मिळाल्यास पुन्हा महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढू असे जाधव यांनी सांगितले.

हे ही वाचा –

जलसंपदा प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनी शेतकऱ्यांना मिळणार परत, पुनर्वसानासाठी राखीव शेरे उठवले जाणार..

दिलासादायक; ९० टक्के अनुदानावर ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशिन, अर्ज सादर करावयाची ही आहे शेवटची तारीख..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button