ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Maratha Reservation | मोठी बातमी ! मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिकेवर 24 जानेवारी रोजी सुनावणी; आंदोलन थांबणार का?

Maratha Reservation | Big news! Hearing on Curative Petition on Maratha Reservation on January 24; Will the movement stop?

Maratha Reservation | मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिकेवर बुधवार 24 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. दुपारी 1.30 वाजता ही सुनावणी होणार असून न्यायमूर्ती खन्ना आणि न्यायमूर्ती गवई यांच्यासमोर ही सुनावणी पार पडेल.

सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह याचिका स्विकारली होती. (Maratha Reservation) यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला होता. आता या सुनावणीमध्ये मराठा समाजाला पुन्हा एकदा आरक्षण मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मराठा आरक्षणाच्या याचिकेवर खुल्या कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारच्या आशा पल्लवित होतील. सरकारला तात्पुरता दिलासा देखील मिळाला असल्याचे बोलले जात आहे.

वाचा | Water Tax Hike | महाराष्ट्रात शेतीच्या पाणीपट्टीत दहापट वाढ; शेतकरी संतप्त; वाचा सविस्तर..

सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाबद्दलची क्युरेटिव्ह पिटिशन ही महाराष्ट्र सरकारला शेवटची संधी असल्याचं वकिलांकडून सांगण्यात आलं होतं. आता या सुनावणीचा निकाल कसा लागतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.

Web TItle | Maratha Reservation | Big news! Hearing on Curative Petition on Maratha Reservation on January 24; Will the movement stop?

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button