ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान
ट्रेंडिंग

Maharashtra Rain | आज राज्यात कुठे ऑरेंज अलर्ट तर कुठे यलो? नागरिकांसह शेतकऱ्यांनो हवामान अंदाज जाणूनचं करा कामाचं नियोजन

Maharashtra Rain | राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. सध्या राज्यात समाधानकारक पाऊस पडलेला असून काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सातत्याने बरसत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे (Maharashtra Rain) जनजीवन विस्कळीत होऊन शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच आता हवामान विभागाने राज्यात पुढील पाच दिवस जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया, राज्यात कोणकोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस बरसणार आहे.

वाचा: Agricultural Advice | शेतकऱ्यांनो पावासाच्या अंदाजानुसार घ्या सोयाबिन अन् कपाशीची काळजी; त्वरीत जाणून घ्या हवामानावर आधारीत कृषि सल्ला

कुठे दिला ऑरेंज अलर्ट?
राज्यात कोकण आणि घाटमाथ्यावर सातत्याने जोरदार ते हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. आज कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच, पुणे आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहे.

नदी नाल्यांना पूर
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्यामुळे हवामान विभागाने या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, कोकणामध्ये पावसाचा जोर कायम आहे. यवतमाळ जिल्ह्यात सातत्याने बरसत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे येथील नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत आहे. आतापर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 2 लाख 37 हजार हेक्टरवरील पिकांचे नद्यांना आलेल्या पुरामुळे नुकसान झाले आहे.

किती झाला पाऊस?
तसेच, हिंगोली जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून रखडलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. सध्या हिंगोली जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे येथील शेती पिकांना मोठा फायदा झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 332 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून हिंगोली जिल्ह्यात 41 टक्के पाऊस पडला आहे. तसेच, हिंगोली जिल्ह्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Where is the orange alert in the state today? Farmers along with citizens should know the weather forecast and plan the work

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button