ताज्या बातम्या

Ajit Pawar | बिग ब्रेकींग! पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्याचा उपमुख्यमंत्र्यांचा निर्णय; घरात पाणी शिरलेल्यांना 10 हजार तर दुकानवाल्यांना…

Ajit Pawar | राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत सरकार प्रत्येक बाबींवर बारीक लक्ष ठेऊन आहे. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्याठिकाणी मदतकार्य वेगानं सुरु आहे. आपत्तीग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. त्यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पूरग्रस्तांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आली आहे.

वाचा: Business Idea | शेतकऱ्यांची ‘या’ पिकातून होणारं बंपर कमाई! चालू महिन्यात लागवड करून फक्त 2 महिन्यांत व्हाल करोडपती

पूरग्रस्तांना तातडीची मदत

पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेत वाढ केली आहे. यावर्षीपासून 5 हजार रुपयांऐवजी 10 हजार रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभा आणि विधानपरिषेदत निवेदनाद्वारे केली आहे. आपत्तीग्रस्तांना तातडीनं पाच हजार रुपयांसह मोफत धान्यवाटप करण्यात येत आहे. या मदत कार्यात कोणताही भेदभाव करण्यात येणार नाही.

आपत्तीग्रस्तांच्या पाठीशी सरकार

आपत्तीत असणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं राहील. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह सह्याद्रीच्या डोंगर परिसरात सातत्यानं नैसर्गिक आपत्ती येत आहेत. याचा विचार करून रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असणारा ‘एनडीआरएफ’चा बेस कॅम्प रायगड जिल्ह्यातच होईल यासाठी राज्य सरकार लक्ष घालेल. त्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Big Breaking! Deputy Chief Minister’s decision to provide emergency assistance to flood victims; 10,000 to those who have water in the house and to the shopkeepers…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button