ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Land Acquisition | पुणे रिंगरोडचे जमीन अधिग्रहण वेगाने सुरू होणार; जाणून घ्या कोणाला होणार मोठा आर्थिक लाभ सविस्तर….

Land Acquisition | Land acquisition of Pune Ring Road to start fast; Know who will get big financial benefits in detail....

Land Acquisition | पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) रिंगरोड हाती घेण्यात आला आहे. या रिंगरोडचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग आहेत. पश्चिम मार्गाच्या (Land Acquisition) भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर पूर्व मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील सहा गावांतील ७३.३१ हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनासाठीचा मोबदला मंगळवारी निश्चित करण्यात आला. यानुसार वडगाव, कातवी, वराळे, आंबी, आकुर्डी आणि माणोलीतर्फ चाकण या गावांतील शेतकऱ्यांना जमिनीच्या प्रकारानुसार प्रति मीटर रुंदीसाठी २२ हजार ते ४० हजार रुपयांचा मोबदला देण्यात येणार आहे.+

वाचा : Land Acquisition Act | भूसंपादन कायदा म्हणजे काय? नवीन सुधारणा काय? शेतकऱ्यांना कायद्याचा फायदा काय? जाणून घ्या

या भूसंपादनासाठीचा निधी संपत आला असून राज्य शासनाकडे एक हजार कोटींची मागणी करण्यात आली आहे. या निधीची उपलब्धता झाल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

या भूसंपादनामुळे मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होणार आहे. तसेच, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

Web Title | Land Acquisition | Land acquisition of Pune Ring Road to start fast; Know who will get big financial benefits in detail….

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button