हवामान

Weather | अरे बाप रे! आता महाराष्ट्रात थंडीत देखील पडणार पाऊस ; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Weather | आता मुंबईसह राज्यात काही ठिकाणी थंडीला सुरुवात झाली असून संध्याकाळी ठिकठिकाणी शेकोटय़ा पेटवल्या जात आहेत. पण मात्र, आता या शेकोट्यांवर पाणी पडणार आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यात थंडीच्या जोराबरोबरच पावसाचा जोर देखील तसाच राहणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता शेकोट्या पेटण्याआधीच विझणार आहेत.

भारतातून गेल्या महिन्यातच मान्सून परतला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. त्याप्रमाणे पाऊस आता गायब झाला. पण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासून मुंबईसह राज्यातील काही भागांमध्ये थंडीची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. तर अशात आता हवामान विभागाने राज्यात सामान्य ते सामान्यापेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

वाचा: अर्रर्र..! 5 वर्षात पीक विमा कंपन्यांनी कमावला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा नफा अन् शेतकऱ्यांना लावला चुना

मुंबईत वाढणार गारठा

आता सध्या मुंबईत बुधवारपासून गारठा जाणवू लागला आहे. तर त्यामुळे गेले काही दिवस उकाडय़ाने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता पंख्याचा वेग मंदावला आहे. तसेच बुधवारी रात्री आणि आज सकाळपर्यंत धुक्याच्या चादरीबरोबर चांगलाच गारठा पडला होता.

उत्तर भारतात तापमान सामान्य

भारतातून आता 23 ऑक्टोबरला पूर्णपणे मान्सून परतल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून उत्तर भारतात थंडीला सुरुवात होते. पण मात्र, अजूनही तिथे थंडीला सुरुवात झालेली नाही. तसेच दिवसाचे तापमान हे 15 अंश सेल्सिअसपेक्षाही वरती असून रात्रीचे तापमान हे नेहमीप्रमाणे कमी झालेले नाही. तसेच उत्तर प्रदेश, बिहारमध्ये अजूनही तापमानात घट झालेली नाही. पण आता उत्तर भारतात नोव्हेंबरच्या मध्यला थंडीला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला
आहे.

वाचा: मोदी सरकारची मोठी घोषणा! महाराष्ट्रासाठी केले तब्बल 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर, तरुणांसाठी सुवर्णसंधी…

कसा होणार पाऊस

आता महाराष्ट्रातील पाऊस हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून आर्द्रता आणणाऱ्या हवामान प्रणालीशी संबंधित आहे. मग त्यामुळे कोकणासह विदर्भात काही भागात नोव्हेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस देखील पडू शकतो. तसेच नोव्हेंबरमधील दिवस हे सामान्य दिवसाच्या तापमानापेक्षा थंड आणि रात्रीच्या तापमानापेक्षा जास्त उबदार होण्याची देखील शक्यता आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title : Oh father! Now rain will fall in Maharashtra even in winter; Meteorological department forecast

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button