कृषी बातम्या

Fertilizer | शेतकऱ्यांचे पैसे वाचणार! सरकारने वाढवल खतवर अनुदान; या खतांवर अनुदान मिळणार

Fertilizer | खते महाग असतात ,काहीवेळा ते पिकांवर विपरित परिणामही करतात. खतांच्या वाढत्या किमतीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. असे असताना केंद्रीय मंत्रिमंडळाने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने फॉस्फरस आणि पोटॅश खतांच्या नवीन दरांना मंजुरी दिली आहे. फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांच्या नवीन दरांना मंजुरी दिली आहे.

वाचा: मोदी सरकारची मोठी घोषणा! महाराष्ट्रासाठी केले तब्बल 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर, तरुणांसाठी सुवर्णसंधी…

शेतकऱ्यांचे पैसे वाचतील
सिंगल सुपर फॉस्फेट केवळ युरिया-डीएपीपेक्षा स्वस्त नाही तर पिकांसाठी खूप प्रभावी आहे. यामुळे लागवडीचा खर्च तर कमी होईलच, पण चांगले उत्पादन मिळाल्याने शेतकऱ्यांचा नफाही वाढेल. तरीही माती परीक्षण आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सिंगल सुपर फॉस्फेट (Fertilizer) किंवा इतर कोणतेही खत पिकावर वापरावे.

हे नवीन दर 1 ऑक्टोबर 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत आहेत. निर्णयानंतर आता शेतकऱ्यांना कमी दरात खते मिळू शकणार आहेत. शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना रब्बी 2022-23 मध्ये सर्व फॉस्फेट खते आणि पोटॅश खते कमी दरात मिळू शकतील. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने हे निर्णय घेतले आहेत. कृषी क्षेत्रालाही मदत होणार आहे. खते आणि कच्च्या मालाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता केंद्र सरकार उचलणार आहे. खत कंपन्याही ठरलेल्या दरांनुसार अनुदानित किमतीत शेतकऱ्यांना खते पुरवतील. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

वाचा: अरे बाप रे! आता महाराष्ट्रात थंडीत देखील पडणार पाऊस ; हवामान खात्याने वर्तवला अंदाज

नवीन दर:

शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात खते देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. खतांचे नवीन दर खालीलप्रमाणे आहेत.
फॉस्फरस – 66.93 रुपये प्रति किलो
नायट्रोजन – 98.02 रुपये प्रति किलो
सल्फर – 6.12 रुपये प्रति किलो
पोटॅश – 23.65 रुपये प्रति किलो
आता खत कंपन्या ठरलेल्या दरांनुसार अनुदानित किमतीत शेतकऱ्यांना खते पुरवतील.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button