ताज्या बातम्या

जीवनावश्यक वस्तूंची वाढली महागाई पण गाईच्या दुधाचे घटले ‘ दर ‘ पहा किती रुपयाने कमी झाले दुधाचे दर…

Inflation of essential commodities has increased but the price of cow's milk has come down. See how much the price of milk has gone down. Read the detailed news.

कधी अवकाळी पाऊस कधी कोरोनामुळे शेतीला बाजारभाव नाही, यातून शेतकरी सावरतो ना सावरतो तोपर्यंत गाईच्या दुधाच्या किंमतीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे अजून एका संकटाची भर शेतकऱ्यांमध्ये पडली आहे. जवळजवळ शेतकऱ्यांना दररोज अडीच ते तीन कोटीचा फटका बसल्याचा दावा केला जात आहे साधारणपणे गाईच्या दुधाची मागणी 20 टक्क्यांनी घट झाल्याचे चित्र समोर आले आहे..

सध्या काही ठिकाणी लॉकडाऊन आहे आठवडी बाजार देखील बंद आहे तसेच हॉटेल, लग्नसोहळे इतर मोठी कार्यक्रम देखील बंद आहे. त्यामुळे बटर, पनीर दही,ताक, लस्सी, आईस्क्रीम याला मागणी नसल्या कारणामुळे गाईच्या दुधामध्ये घट करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यात साधारणपणे दीड कोटी लिटर च्या जवळपास गायीचे दूध संकलित केले जाते मात्र कोरोनामुळे परत लॉकडाऊन होण्याच्या भीतीने दुधाची मागणी घटली आहे. दूध पावडर ची मागणीदेखील घटली आहे त्यामुळे दूध पावडर चे दर कमी झाले आहेत.

लॉकडाउन भीतीमुळे या बाबींवर गंभीर परिणाम होत असल्याचा दिसून येतो. परिणामी दोन संघ वगळता एक एप्रिलपासून राज्यातील खासगी दूध संघांनी प्रतिलिटर दोन रुपयांनी दर कमी केले आहेत.

दूध व दुग्धजन्य पदार्थांची खरेदी कमी झाल्यामुळे मागणीत घट झाली आहे दुधाच्या दरावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. परंतु शासनाने यात लक्ष घालून शेतकऱ्यांचा विचार करून दुधाचे दर कमी होणार नाहीत याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button