महत्त्वमहालक्ष्मी पूजन कधी करावे? यावेळी सुरू होणार लक्ष्मीपूजनाचा मुहुर्त, जाणून विधी आणि धार्मिक व आरती…
Lakshmi Puja | आता दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी सुरू झाली आहे. तर दिवाळीत दर वर्षी कार्तिक कृष्ण पक्षाच्या अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. आणखीन विशेष म्हणजे भगवान श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून याच दिवशी अयोध्येत परतले होते. तसेच दिवाळीच्याच दिवशी माता लक्ष्मी प्रगट झाली होती अशी देखील मान्यता आहे. म्हणून या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. तर वाल्मिकी रामायणानुसार या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा विवाह झाला होता. तसेच दिवाळीच्या सांयकाळी लक्ष्मी, गणेश आणि भगवान कुबेराची पुजा केली जाते. तर मग जाणून (information) घेऊया लक्ष्मीपूजनाचा मुहुर्त आणि विधी.
दर वर्षी आश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. तर या दिवशी प्रदोषकाळी म्हणजेच संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. असे म्हटले जाते की लक्ष्मी ही फार चंचल असते त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणेच लक्ष्मी पूजन हे स्थिर मुहूर्तावर करतात. त्याने लक्ष्मी ही स्थिर राहते असा काही लोकांचा समज आहे.
तर मग कसे करावे लक्ष्मी पुजन ?
तर लक्ष्मी पुजनाच्या दिवशी अनेक घरांत श्रीसूक्तपठण केले जाते. तर व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष हे लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. तसेच या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करून पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात मग त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवतात व त्यांची पूजा करतात. तसेच हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी बऱ्याच घरात स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवीन केरसुणी देखील विकत घेतली जाते. मग तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.
लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त व त्यासाठी लागणारे साहित्य
तर या वर्षी 24 आणि 25 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी कार्तिक महिन्यातल्या अमावस्येलाला दिवाळी साजरी केली जाणार आहे. तसेच या वर्षी 25 ऑक्टोबरला प्रदोष काळाच्या आधीच अमावस्या तिथी संपत (information) असल्यामुळे 24 ऑक्टोबरलाच प्रदोष काळात लक्ष्मी पुजन करावे. तसेच 24 ऑक्टोबरला प्रदोष काळात सायं 6.05 ते 8.30 हा मुहूर्त लक्ष्मी पूजनासाठी शुभ असणार आहे. तर मग लक्ष्मी पूजनासाठी शंख, कमळाचे फूल, गोमती चक्र, कोथंबीरचे दाणे, कच्चे शिंगाटे आणि मोत्यांची माळ हे साहित्य आवश्क आहे.
दिवाळीच्या दिवशी का केले जाते लक्ष्मीपूजन ?
दोन महत्त्वाची मूल्ये ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती ‘ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने मनात रुजतात म्हणून ही पूजा विशेष मानली जाते. तर भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. परंतु ते केवळ संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. तर दिवाळीच्या दिवशी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला ‘मांडणे’ असे देखील म्हणतात (information) व त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे हे विधी केले जातात.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मुख्यमंत्री शिंदेंकडून या बँकेतून घेतलेल्या कर्ज वाल्यांना कर्जमाफीची घोषणा..
- अधिक उत्पादन वाढीसाठी व रोगराईमुक्त सोयाबीन जातींचा शोध…
Web title : Lakshmi Puja will start at this time, knowing rituals and religious…