ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Human Trafficking | बापरे ! सीबीआयने रशिया-युक्रेन युद्धासाठी मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश !

Human Trafficking | Father! CBI busted human trafficking racket for Russia-Ukraine war!

Human Trafficking | रशिया-युक्रेन युद्धासाठी भारतातून तरुणांची मानवी तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीबीआयने या प्रकरणात मोठी कारवाई करत मुंबईसह सात शहरांमध्ये छापेमारी केली आहे. या छापेमारीत 50 लाख रोख रक्कम, संशयास्पद कागदपत्रे आणि तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत 35 जणांची मानवी तस्करी (Human Trafficking) झाल्याचं तपासात समोर आलं आहे.

सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी देणाऱ्या जाहिरातींमार्फत तरुणांना आकर्षित करून त्यांची मानवी तस्करी (Human Trafficking) केली जात होती. या तरुणांना परदेशात पाठवून ट्रेनिंग देऊन रशियामध्ये डांबून ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध रशिया-युक्रेनच्या बॉर्डरवर बंदोबस्ताला तैनात करण्यात आलं. काही तरुणांना गंभीर इजा होऊन ते जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे.

वाचा | रक्तचंदन नेमक काय आहे? याची एवढी तस्करी का होते? एवढी किंमत कशी? पहा रक्तचंदन विषयी सविस्तर..

सीबीआयने या प्रकरणी अनेक व्हिजा कन्सल्टन्सी आणि एजंट विरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सीबीआयने नागरिकांना नोकऱ्यांच्या खोट्या जाहिरातींना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

या प्रकरणातील काही महत्त्वाचे मुद्दे:

  • सीबीआयने रशिया-युक्रेन युद्धासाठी मानवी तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
  • मुंबईसह सात शहरांमध्ये छापेमारी करण्यात आली आहे.
  • 50 लाख रोख रक्कम, संशयास्पद कागदपत्रे आणि तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
  • आत्तापर्यंत 35 जणांची मानवी तस्करी झाल्याचं तपासात समोर आलं आहे.
  • सीबीआयने अनेक व्हिजा कन्सल्टन्सी आणि एजंट विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
  • काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
  • सीबीआयने नागरिकांना नोकऱ्यांच्या खोट्या जाहिरातींना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

Web Title | Human Trafficking | Father! CBI busted human trafficking racket for Russia-Ukraine war!

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button