ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

Cotton Rates | एकीकडे अवकाळी पाऊस दुसरीकडे पडलेले दर! जाणून घ्या का नाही मिळत आहे कापसाला भाव ?

Cotton Rates | कापसाचे उत्पादन कमी होऊन सुद्धा सध्या कापसाचे दर दबावात आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी कापसाची आवक पाच पटींनी जास्त आहे. मात्र कापूस उत्पादकांना तोटा होत आहे. यंदाच्या वर्षी कापूस उत्पादन कमी झाले आहे. त्यात कापूस तयार होऊन सात महिने झाले आहेत. तरीदेखील कापसाचे भाव कमीच आहेत.

कापसाची आवक वाढली

मार्चपासून बाजारात कापसाची आवक वाढली आहे. याआधी शेतकऱ्यांना कापूस साठवून ठेवला होता. मात्र दराच्या आशेने मार्च मध्ये कापूस बाजारात आणला. यामुळे या हंगामातील उचांकी आवक मार्च महिन्यापासूनच सुरु झाली. याचा परिणाम दरावर झाला आणि कापसाचे दर आणखी कमी झाले.

आंतरराष्ट्रीय बाजारावर होतोय परिणाम

जागतिक कापूस बाजारात भारताला महत्वाचे स्थान आहे. भारतात कापसाचे दर घटल्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारावर (International Market) दिसतोय. यंदा सध्याची कापसाची बाजारातील आवक १ लाख १० हजार गाठींच्या दरम्यान आहे. मागच्या वर्षी याच महिन्यात २० हजार गाठींपेक्षा कमी होती. म्हणजे यंदाची कापसाची आवक ५ ते ६ पटींनी वाढली आहे. मागच्या वर्षी या महिन्यात कापूस तेजीत होता.

…म्हणून आवक वाढली

सध्या महाराष्ट्र व इतर राज्यांमधल्या कापूस भागांमध्ये अवकाळी पाऊस पडतोय. यामुळे शेतकऱ्यांना कापूस साठविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. काही ठिकाणी तर कापूस ओला होऊन नुकसान झाले आहे. म्हणून शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला काढलाय. त्यामुळे बाजारात कापसाची आवक वाढली आहे.

शेतकरी आर्थिक कोंडीत

सध्या बाजारात कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार १०० रुपयांचा भाव मिळतोय. हा या हंगामातील निचांकी भाव आहे. यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत. आधीच नैसर्गिक संकटांमुळे यंदा कापसाचे उत्पादन कमी आहे. त्यात कापसाला दर सुद्धा नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Prize of cotton in market is down hence farmers get tensed

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button