ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

Black Tomato | काळे टोमॅटो लावा आणि व्हा मालामाल ! लाखो रुपयांची करता येते कमाई

Black Tomato | टोमॅटो (black Tomato) हे रोजच्या आहारात वापरले जाते. यामुळे बाजारात देखील त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. सामान्यपणे लोक लाल टोमॅटो खातात. मात्र तुम्हाला माहिती आहे का ? आपल्या देशात काळ्या टोमॅटोची सुद्धा शेती केली जाते. काळा टोमॅटोला लाल टोमॅटोपेक्षा जास्त भाव असतो. यामुळे भारतातील विविध राज्यांमध्ये काळ्या टोमॅटोची शेती केली जाते.

उष्ण भागात करता येते शेती

काळ्या टोमॅटोची शेती प्रामुख्याने उष्ण भागात करतात. कारण, या शेतीसाठी उष्ण वायू जास्त चांगला असतो. काळ्या टोमॅटोच्या शेतीसाठी मातीचा पीएच ६ ते ७ च्या दरम्यान लागतो. कारण भारतात जास्त भागात उष्ण वायू असल्याने येथे टोमॅटोची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.

युरोपमध्ये म्हणतात सुपरफूड

काळ्या टोमॅटोची किंमत लाल टोमॅटोपेक्षा जास्त असते. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगली कमाई होते. काळ्या टोमॅटोला उशिरा फळं लागत असली तरी, त्याची किंमत जास्त असल्याने शेतकऱ्यांना जास्त फायदा होतो. युरोपमध्ये तर काळ्या टोमॅटोला सुपरफूड असे म्हंटले जाते.

काळ्या टोमॅटोचे फायदे

१) काळ्या टोमॅटोमुळे व्हिटॅमीन-सी, व्हिटॅमीन ए आणि व्हिटॅमीन के भरपूर प्रमाणात मिळते.
२) या टोमॅटोचे सेवन केल्याने बरेच आजार बरे होतात.
३) काळ्या टोमॅटोचा वापर ब्युटी प्रोडक्ट्समध्ये होतो. ४) काळे टमाटर सलादच्या रुपात खाल्ले जाते.

काळ्या टोमॅटोच्या शेतीतून होणारी कमाई

काळ्या टोमॅटोची लावणी हिवाळ्यात केली जाते. खास करून जानेवारी महिना या टोमॅटोच्या लागवडीसाठी चांगला असतो. यानंतर तीन महिन्यांमध्ये झाडाला टमाटर लागतात. याचा अर्थ एप्रिल महिन्यात काळ्या टमाटरची तोडणी करता येते. एका हेक्टरमध्ये काळ्या टमाटरची लागवड केली तर, चार लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Farmers can get big profit in black tomato farming

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button