ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी तंत्रज्ञान

Electric Scooter | ११० किमी धावणारी गाडी! दुधाच्या किटल्या, भाजीपाला एका झटक्यात वहा! गती, मजबुती, आराम देणारी शेती इलेक्ट्रिक दुचाकी!

Electric Scooter | 110 km running car! Carry milk kettles, vegetables in a flash! Speed, strength, comfort agricultural electric bike!

Electric Scooter | शेतकऱ्यांच्या कष्टाला थोडं हातभार लावणारी आणि पर्यावरणालाही पोषणारी अशी एक नवीन इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात आली आहे. ही दुचाकी फक्त स्वारीसाठीच नाही, तर थेट सहा ते आठ भाजीपालाच्या क्रेट किंवा सहा दुधाच्या किटल्या घेऊन जाण्याइतपर्यंतची मजबूत आहे. त्यामुळे शेतमाल मालवाहतुकीसाठी ती उत्तम पर्याय ठरत आहे.

ही पूर्णपणे (Electric Scooter) इलेक्ट्रिक दुचाकी एकदा चार्ज केल्यानंतर ११० किलोमीटरपर्यंत धावू शकते. म्हणजेच शेतात, बाजारात किंवा सहकारी संस्थेपर्यंत माल नेणासाठी ती कधीही खिचत नाही. गाडीच्या गतीचे तीन पर्याय असल्यामुळ रस्ता आणि शेतानुसार वेग निवडता येतो. ५० किमी प्रतितास हा वेग सर्वांत जास्त आहे.

दुचाकीची मजबुतीवरही भरपूर लक्ष देण्यात आलं आहे. ती पूर्णपणे मेटल बॉडीची बनवली असून १७० एमएम इतका ग्राउंड क्लिअरन्स आहे. त्यामुळे खराब रस्त्यावरूनही ती सहज धावते. शिवाय, गाडीला मिड मोटर असल्यामुळे बॅलन्स राखणे सोपे आहे. टेलिस्कॉपिक आणि ऑईल स्प्रिंग शॉकअप तसंच स्पोक टायरमुळे गाडीची आयुर्दी वाढते आणि तिची देखभालही सोपी होते.

पुण्यातील किसान प्रदर्शनामध्ये या दुचाकीवर सवलतही होती. कंपनीच्या प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार, तिची ऑन रोड किंमत ७६ हजार ५०० रुपये इतकी आहे, तर शोरूम किंमत ८१ ते ८२ हजार रुपयेंच्या आसपास आहे.

या इलेक्ट्रिक दुचाकीमुळे शेतकऱ्यांचा पेट्रोल-डिझेलवर होणारा खर्च तर वाचणारच, पण शेतमाल वाहून नेण्याचं कामही सुलभ होईल. शिवाय, पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठीही ती हातभार लावणार आहे.

वाचा : Electric Scooter Subsidy | काय सांगता? इलेक्ट्रिक स्कूटर खरेदीवर 90% सबसिडी, तीही मिळणार फक्त दोन दिवसात

किसान मेळाव्यात तंत्रज्ञानाची झलक

पुण्यातील किसान प्रदर्शनामध्ये या दुचाकीसह अनेक नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पाहण्यास मिळालं. या मेळाव्यात नवीनतम शेती यंत्रे, अवजारे, खतं आणि औषधे प्रदर्शित करण्यात आली होती. शेती तंत्रज्ञानात झालेली प्रगती पाहण्याची ही शेतकऱ्यांसाठी उत्तम संधी होती.

एकूणच, ही इलेक्ट्रिक दुचाकी आणि किसान मेळाव्यासारखे उपक्रम शेती क्षेत्रात क्रांती घडवून आणू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा सदुपयोग करून उत्पादकता वाढवण्यावर आणि शेती अधिक फायदेशीर बनवण्यावर लक्ष केंद्रित करावं.

Web Title : Electric Scooter | 110 km running car! Carry milk kettles, vegetables in a flash! Speed, strength, comfort agricultural electric bike!

हेही वाचा :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button