कृषी तंत्रज्ञान

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ई-गोपाला ;ॅप आणि मत्स्यव्यवसाय साठी खुशखबर; होणार मोठा फायदा…

पंतप्रधानांनी शेतकऱ्यांसाठी ई-गोपाला अॅपची सुरूवात केली आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेजचा एक भाग म्हणून, सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये आर्थिक वर्ष 2020-21 ते आर्थिक वर्ष 2024-25 पर्यंत 5 वर्षांच्या कालावधीत त्याच्या अंमल

बजावणीसाठी अंदाजे 20,050 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना…

पीएमएमएसवाय अंतर्गत 20,050 कोटी रुपयांची गुंतवणूक ही मत्स्यव्यवसाय क्षेत्रातली आतापर्यंतची सर्वाधिक गुंतवणूक आहे.

सागरी, अंतर्देशीय मत्स्यव्यवसाय आणि जलशेती मधील लाभार्थीभिमुख उपक्रमांसाठी 12340 कोटी रुपये आणि मत्स्यव्यवसाय पायाभूत सुविधांसाठी सुमारे 7710 कोटी रुपये प्रस्तावित आहेत.

2024-25 पर्यंत मासळीचे उत्पादन अतिरिक्त 70 लाख टनाने वाढवणे, 2024-25 पर्यंत मत्स्यपालन निर्यात महसूल 1,00,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणे , मत्स्यपालक आणि मत्स्य शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि कापणीनंतरचे नुकसान 20-25% वरून 10% पर्यंत कमी करणे.

मत्स्यव्यवसाय क्षेत्र आणि संबंधित कामांमध्ये अतिरिक्त 55 लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदेशीर रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे पीएमएमएसवायचे उद्दिष्ट आहे.

काय आहे ई-गोपाला अ‍ॅप?

शेतकयांच्या थेट वापरासाठी एक व्यापक प्रजनन सुधारणा बाजारपेठ आणि माहिती पोर्टल आहे. सर्व प्रकारचे (वीर्य, ​​भ्रूण इत्यादी) रोगमुक्त जंतुनाशक खरेदी व विक्री यासह दर्जेदार प्रजनन सेवांची उपलब्धता (कृत्रिम रेतन, पशुवैद्यकीय प्रथमोपचार, लसीकरण, उपचार इ.) आणि पशु पोषण, योग्य आयुर्वेदिक औषध / प्राण्यांच्या पशुवैद्यकीय औषधांचा वापर करून जनावरांवर उपचार करणे यासाठी मार्गदर्शन करण्यासह पशुधनाचे व्यवस्थापन आहे.

लसीकरण, गर्भधारणेचे निदान, वासराचा जन्म याच्या तारखांबाबतची माहिती देण्यासाठी आणि विविध शासकीय योजना व मोहिमेविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्याची कोणतीही यंत्रणा नाही. ई-गोपाला ऍप्प या सर्व बाबींवर शेतकऱ्यांना उपाय सांगणार आहे.

⬇️ अ‍ॅप असे करा डाऊनलोड 👉 play.google.com/store/apps/details?id=coop.nddb.pashuposhan

WEB TITLE: E-Gopala app for dairy farmers and good news for fisheries; There will be a big benefit …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button