बर्ड फ्लू आलाय! घ्या कोंमड्यांची अशी काळजी! पहा प्रतिबंधात्मक उपाय.
Bird flu has arrived! Take such care of the hens! See preventive measures.
अलीकडच्या काळामध्ये कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लू चे प्रमाण वाढल्यामुळे कूकूट उद्योजकांना चांगलाच फटका बसला आहे. बर्ड फ्लू रोखण्यासाठी काय प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे हे आपण पाहूयात:
बर्ड फ्लू हा संसर्गजन्य रोग असून तो सर्व पक्षांमध्ये संक्रमित होतो. हा रोगी ‘एच फाईव’ नावाच्या विषाणू मधून होतो. तसेच बर्ड फ्लू मुळे 80 ते 100 टक्के पक्षी मृत होतात. यात महाराष्ट्रासह हरियाना गुजरात केरळ उत्तर प्रदेश राजस्थान या राज्याचा समावेश आहे.
भारतामध्ये बर्ड फ्लू 2006 रोजी आढळून आला. महाराष्ट्रातील नंदुरबार येथे. हा संसर्गजन्य रोग असून त्याचा प्रादुर्भाव होत आहे याविषयी समजताच उत्पादनात 25 टक्के घट एकट्या महाराष्ट्रात झाली. त्यामुळे बर्ड फ्लू रोखण्यासाठी काय उपाययोजना आहेत. त्याची लक्षणे, याचा आढावा आपण घेऊ
📌 लक्षणे:
कोंमड्या मध्ये बर्ड फ्लूची लक्षणे पटकन दिसून येतात, या विषाणू चा रोग निर्माण करण्याचा काळ काही तास ते 14 दिवस एवढा असतो. त्यामुळे कोंबड्या काही काळातच मृत्युमुखी पडतात.
👉 प्रथमता कोंबड्यांचे खाणे पिणे बंद होऊन ते सुस्त होतात.
👉 नाकातोंडातून रक्त मिश्रित स्त्राव बाहेर येतो
👉 तोंडाचा व डोळ्याचा भाग सुचतो
👉 विष्टा चा रंग हिरवा होतो पायांना सूज येते
👉 पक्षी निस्तेज दिसतात पंख विखुरल्या सारखे दिसतात.पक्ष्यांना चालताना त्रास होतो.
👉अंडी उत्पादने कमी होतात.
📌कोंबडीचे मास खाने सुरक्षित आहे का?
👉 बर्ड फ्लू विषाणूचा संसर्ग होण्याची भीती नाही तसेच रोगाचा प्रादुर्भाव असलेल्या भागामध्ये अंडी नेहमीप्रमाणे खाणे शक्य आहे.
👉 बर्ल्ड फ्लूचा विषाणू 70 अंश सेल्सिअस तापमानामध्ये नष्ट होतो. स्वयंपाक पद्धती मध्ये तापमान असते. त्यामुळे हा विषाणू नाश पावतो. तरीदेखील हे पदार्थ करताना किमान अर्धा तास शिजवावे.
👉 भारतामध्ये शिजलेल्या अन्नातून बर्ड फ्लू चा प्रसार झालेची एकही नोंद नाही. तसेच मानवहानीही झाली नाही. मात्र 👉कुक्कुट पालन करणाऱ्या लोकांनी हॅन्ड ग्लोज मास्क घालने बंधनकारक आहे.
🙂 पक्ष्यांची कशी काळजी घ्याल:
👉 त्यांना शक्यतो दिवसा बाहेर पडू देऊ नका. शेजारच्या कोंबड्या, कबुतरे, कावळे यांच्यात मिसळून होऊ देऊ नका.
👉 अंगण व भोवतालचा परिसर स्वच्छ कचरा नियमितपणे जाळावा.
👉 जंगली व स्थलांतरित पक्षी पकडून ठेवू नका व कोंबडी असतील त्या पिंजऱ्यात ठेवू नका.
👉 मृत पक्षी मोकळ्या जागी, नाल्यांमध्ये टाकू नका.
👉 लक्षणे आढळल्यास अधिकार्यांशी संपर्क साधा.
🙂 प्रतिबंधात्मक उपाय योजना:
👉 कुकुट पालन करताना एकसमान वयोगटातील पक्षी पाळण्याचे धोरण आखावे.
👉 कोंबड्या जंगली पक्षी किंवा स्थलांतरित पक्षाच्या संपर्कात येऊ देऊ नयेत
👉 दूषित पाण्यापासून सुद्धा दूर ठेवावे. स्वच्छ पाण्याची सोय करावी
👉 फार्मवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वच्छ कपडे व निर्जंतुक करण्याचे सामान पुरवावे.
👉चालू चे प्रमाण कमी करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साइड क्लोराईड दोन टक्के किंवा फॉर्मलिन 4% यासारख्या जंतुनाशक फवारणी करावी.
👉फवारणी दर पंधरा दिवसाला करावी.