ताज्या बातम्या

बँका ‘ ह्या ‘तारखेला बंद ! पटकन आटपून घ्या आर्थिक व्यवहार नाहीतर ताटकळ बसावे लागेल…

Banks closed on 'this' date! Finish quickly, otherwise you will have to settle down.

मार्च महिना आर्थिक वर्षाचा हा शेवटचा महिना असून बँकेसह वित्तीय क्षेत्रासाठी हा महिना अत्यंत महत्वाचा आहे. सर्व बँकांना 31 मार्चपर्यंत आर्थिक वर्षासाठी आपले खाते बंद करावे लागते. यामुळे जर बँकेशी संबंधित काही काम असेल तर ते लवकरात लवकर करा. जर आपण 26 मार्चपर्यंत बँकिंगचे काम पूर्ण केले नाही तर आपल्याला सुट्टी संपेपर्यंत वाट पाहावी लागेल.(Do urgent work till March 26, )

यामुळे आपली बँकिंगची कामे पटकन करुन घ्यावी. नाहीतर ताटकळत बसावे लागेल.रविवार, 21 मार्च रोजी बँका बंद राहतील आणि 22 मार्च ते 26 मार्च दरम्यान बँका खुल्या असतील. त्यानंतर 27 मार्च रोजी महिन्याचा चौथा शनिवार आहे तर 28 मार्चला रविवार आहे, म्हणून दोन्ही दिवस बँका बंद राहतील. त्यानंतर 29 मार्चपासून नवीन आठवडा सुरू होईल. मात्र 29 मार्च रोजी होळीमुळे बँक बंद राहिल.

नवे आर्थिक वर्ष सुरु

31 मार्च हा सध्याच्या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. त्या दिवशी बँक खुली राहील, परंतु खाते बंद झाल्यामुळे बँकेत सार्वजनिक व्यवहार केले जाणार नाहीत. नवीन आर्थिक वर्ष (2021-22) 1 एप्रिलपासून सुरू होईल. 1 एप्रिल रोजी गुरुवार आहे आणि मार्च क्लोजिंगची प्रक्रिया पूर्ण करुन नवीन प्रक्रिया सुरु करायची असल्यामुळे बँकेत सार्वजनिक व्यवहार केले जात नाहीत. म्हणजे दोन दिवस (31 मार्च आणि 1 एप्रिल रोजी बँक सर्वसामान्यांसाठी बंद असल्याचे समजते). बँक सरकारबरोबर आर्थिक व्यवहार करते आणि आपले खाते बंद करते.
(Do urgent work till March 26, banks will open only two days in next 10 days)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button