कृषी तंत्रज्ञान

New software| आता शेतकऱ्यांची फसवणुक थांबणार! ‘या’ सॉफ्टवेअरमुळे बनावट अंगठ्यांना बसणार आळा

New software| सरकार(govt) दरवर्षी नागरिकांसाठी शासकीय योजना राबवत असते. लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत कोणती ना कोणती योजना उपलब्ध असते. परंतु त्या योजना खरचं लोकांपर्यंत पोहचतात का ? लोकांना त्या योजनेचा फायदा मिळतो का? आणि योजना पोहचल्या तर लोकं त्याचा गैरवापर तर नाही ना करत? या प्रश्नांना आळा घालण्यासाठी सरकारने नवीन सॉफ्टवेअर(Softwear) सुरू केलं आहे. जाणून घ्या काय आहे हे नवीन सॉफ्टवेअर.

वाचाYojana | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता शेळीपालनासाठी 100 टक्के अनुदान, ‘या’ दोन योजनांना मंजुरी

काय आहे हे नवीन सॉफ्टवेअर?

राज्यात विविध शासकीय योजना राबवल्या जातात. त्या योजनेचा पूर्ण लाभ लाभार्थ्यांना मिळावा व थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा व्हावेत हे उ्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन सरकारने पाऊले उचलली आहेत. कधी कधी लभार्त्यांची फसवणूक होते. एखादा लाभार्थी(Beneficiary)मृत पावला असताना देखील त्या व्यक्तीच्या बनावट अंगठ्याचा उपयोग करून लाभार्थ्यांच्या खात्यातून रक्कम काढली जाते. यासाठीच शासनाने सीडॅक नावाचे सॉफ्टवेअर वापरात आणले आहे.

कशी होते लाभार्थ्यांची फसवणूक?

राज्यात विविध योजना राबविण्यात येतात मग ती शेतकरी कर्जमाफी असेल किंवा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती असेल , याची रक्कम थेट डीबिटी पोर्टल(dbt portal) मार्फत जमा होते. निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत हजारो कोटी लाभार्त्यांच्या खात्यात जमा होतात. ७००० कोटीहून जास्त रक्कम ही शिष्यवृत्ती(scholarship)अंतर्गत विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात. शेतऱ्यांसाठी विविध शासकीय योजनांतर्गत त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाते. परंतु याचा फायदा घेत एखादी व्यक्ती मृत पावली असताना देखील त्याचा बनावट अंगठा वापरून ही रक्कम खात्यातून काढली जाते. यामुळे सरकारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. याच गोष्टीला आळा घालण्यासाठी सीडॅक सॉफ्टवेअर काम करणार आहे.

वाचा: Soybean Rate | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मका अन् सोयाबीनचे भाव राहणार कायम? जाणून घ्या काय आहे कारण

कसं करणार सीडॅक सॉफ्टवेअर काम?

लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होत असताना कित्येकदा बनावट अंगठा वापरून त्यातून पैसे काढले जातात. यावर उपाय म्हणून हे सीडॅक सॉफ्टवेअर काम करणार आहे. ज्या अंगठ्याच्या खाली रक्तभिसरण चालू आहे अशाच अंगठ्याना हे सॉफ्टवेअर स्वीकारणार आहे. ज्या अंगठ्याखाली रक्ताभिसरण चालू नसेल तो अंगठा हे सॉफ्टवेअर स्वीकारत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांच्या फसवणुकीला आळा बसणार असून सरकारचे देखील नुकसान न होण्यास याची मदत होणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title:Beneficiaries benefit from new software. Fake thumbs will stop now…. New system of Govt

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button