ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Home loan | सावधान ! गृहकर्ज घेताय तर एकदा विचार कराच; असे होऊ शकते नुकसान

Home loan | स्वतःचे घर बांधणे हे प्रत्येक सामान्य व्यक्तीचे स्वप्न असते. मात्र सध्याच्या काळात महागाई प्रचंड वाढली आहे. यामुळे घर बांधणे तितकेसे सोप्पे राहिलेले नाही. म्हणून लोक घरासाठी गृहकर्ज घेतात किंवा इतर काही तजवीज करतात. याकाळात बँका नवनवीन युक्त्या वापरून आपल्याकडून जास्तीचे पैसे उकळतात. कर्ज (Loan) घेताना माणसे भावनिक होऊन कर्ज देणाऱ्या संस्थांच्या दृष्टचक्रात अडकतात. यामुळे सामान्य लोकांच्या खिशावर अनावश्यक असा आर्थिक ताण ( Financial Pressure) येतो.

पैसे कमावणे हा एकच उद्देश

खरंतर बँका आणि वित्तीय संस्थांचा ग्राहकांकडून जास्तीत जास्त पैसे कमावने हा एकच उद्देश असतो. जरी बँका व वित्तीय संस्था आपल्या हिताचा विचार करत असल्याचे भासवत असल्या तरी त्या आपल्या हितासाठी कमी आणि स्वतःच्या हितासाठी जास्त काम करतात. अशावेळी आपण योग्य ती माहिती घेऊन पाऊल टाकणे गरजेचे असते.

वाचा: ‘बँकांनी मारले सरकारने तारले’ ! शेतकऱ्यांना पीककर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई होणार ; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

कर्जासोबत देतात विमा पॉलिसी

बँक आपल्याला कर्ज देते इथपर्यंत ठीक आहे. मात्र बँक आपल्याला कर्जासोबत विमा पॉलिसी (policy) सुद्धा विकते. हे जरा वादग्रस्त वाटते. बँक आपल्याला कर्ज देते तेव्हा ती त्यावर व्याज आकारते. याशिवाय बँक कर्ज घेताना तुम्हाला टर्म इन्शुरन्स ( term insurance) देते जेणेकरून ती आपल्या कर्जाची सिक्युरिटी घेऊ शकेल.

म्हणून आर्थिक नुकसान होते

मात्र इथेच मोठी चूक होते. बँका आपल्याकडून इन्शुरन्सच्या नावाखाली हव्या त्या पद्धतीने पैसे उकळतात. यावेळी बँक आपल्याला योग्य वेळी योग्य माहिती देत नाहीत. तसेच कर्ज घेणारे लोक सुद्धा भावनिक होऊन लक्ष देत नाहीत. यामुळे आपले आर्थिक नुकसान होते.

असे गंडवले जाते

यावेळी बँक हुशारीने तुमच्या कर्जाच्या रकमेत विम्याची रक्कम EMI मध्ये जोडते. त्यानंतर पॉलिसीसाठी तुम्हाला काहीही करावे लागणार नाही हे बँका सांगतात. तसेच आम्ही कर्जाच्या प्रीमियममध्ये फक्त 100 रुपये जोडणार आहोत, जे कर्जाच्या ईएमआयसह हळूहळू फेडले जाईल. असे सांगून भुलवले जाते. मग आपण सुद्धा लगेच ते स्वीकारतो. परिणामी आपल्याला घराच्या EMI सोबत इन्शुरन्सच्या प्रिमिअम सुद्धा भरावा लागतो.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Banks try to cheat on people during home loan process

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button