ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी सल्ला

बातमी कामाची ! हुमणीचा बंदोबस्त करण्याचा जालीम उपाय ; जाणून घ्या सविस्तर

शेती हा पूर्णतः निसर्गावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे. निसर्गाने साथ दिली तर ती बहरते अन्यथा नुकसान होते. मागील काही वर्षांपासून राज्याच्या विविध भागांत हुमणी ( Humani) किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. कितीही औषधपाणी केले तरी साहसा की कीड लवकर नियंत्रणात ( in control) येत नाही. म्हणून या किडीच्या नियंत्रणासाठी सामुदायिक उपाययोजना करण्याची गरज आहे.

हुमणी आळीचा प्रादुर्भाव

खरिप हंगामात प्रामुख्याने भात, ऊस, ज्वारी यांसारखी पिके घेतली जातात. तर, रब्बीमध्ये गहू, हरभरा अशा प्रकारची पिके घेतली जातात. या पिकांवर मोठ्या प्रमाणात हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसतो. यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याचा परिणाम थेट पिकाच्या उत्पादनावर होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान ( Finantial Loss) होते.

हुमणी किडीच्या प्रजाती

महाराष्ट्रात हुमणी किडीच्या मुख्यतः दोन प्रजाती आढळतात. होलोट्रिकीया सेराटा व ल्युकोफोलीस लेपिडोफोरा ही या दोन प्रजातींची नावे आहेत.
यातील होलोट्रिकीया सेराटा या जातीचा प्रादुर्भाव नांदेड, बुलढाणा, नगर, धुळे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये दिसून येतो. तर ल्युकोफोलीस लेपिडोफोरा या प्रजातीचा प्रादुर्भाव कोल्हापूर आणि सांगली जिल्हाच्या पश्चिम भागात दिसून येतो.

होलोट्रिकीया सेराटा या जातीची हुमणी माळ भागात आढळते. तर, ल्युकोफोलीस जातीची हुमणी नदीकाठी आढळते. बागायती पिकामध्ये जास्त ओलावा असतो. तसेच सातत्याने अन्नपुरवठा होत असतो. यामुळे हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढतो.

For stages of Humani | हुमणी अळीच्या चार अवस्था

१) अंडी अवस्था
२) अळी अवस्था
३) कोष अवस्था
४) भुंगेरे अवस्था

वाचा: खुशखबर ! शेतकऱ्यांना १०० टक्के अनुदानावर मिळणार जमीन ; जाणून घ्या, काय आहे योजना ?

भुंगेऱ्यांचा अवस्थेत असताना कसा बंदोबस्त करावा ?

भुंगेरे या एकमेव अवस्थेत हुमणी जमिनीबाहेर असते. यामुळे या अवस्थेत हुमणीचा बंदोबस्त करण्यावर जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. पहिला पाऊस झाला की, हुमणीचे भुंगेरे सुर्यास्तानंतर बाभूळ, बोर, लिंब या झाडांवर पाने खाण्यासाठी गोळा होतात. या झाडांच्या फांद्या रात्री काठीच्या सहाय्याने हलवून खाली पडलेले भुंगेरे गोळा करावीत. त्यांनतर रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून त्यांना मारावे.

हुमणी अळीचा बंदोबस्त कसा करावा ?

१) पीक काढणी झाल्यानंतर १५ ते २० सेंमी. खोल नांगरट करावी.
२) नांगरणीवेळी उघड्या पडणाऱ्या अळ्या गोळा कराव्यात व रॉकेल मिश्रीत पाण्यात टाकून माराव्यात.
३) आंतरमशागतीच्या वेळेस सापडलेल्या अळ्या गोळा करुन लोखंडी हुकच्या सहाय्याने किंवा खुरप्याने माराव्यात.
४)पिकाला पाणी देताना एखाद्या दिवशी पाणी जास्त काळ साचून ठेवल्यास अळ्या गुदमरून मरतात.

हुमणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिचे नैसर्गिक शत्रू अतिशय महत्वाचे आहेत. यामध्ये बगळा, चिमणी, मैना, कावळा, घार या पक्षांचा समावेश होतो. याशिवाय
मांजर, रानडुक्कर, मुंगूस, कुत्रा हे प्राणी सुद्धा हुमणीचा फडशा पाडतात. तसेच जिवाणू (बॅसीलस पॉपीली) व सूत्रकृमी (हेटरो-हॅब्डेटीस) हे होलोट्रिकीया हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत.

How to control humani in farm

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button