lang="en-US"> Anushka Jaiswal Success Story | शिक्षणानंतर नोकरी नाही तर शेती! 27 वर्षांच्या तरुणीचा शेतीतून 45 लाखांचा नफा!

Anushka Jaiswal Success Story | शिक्षणानंतर नोकरी नाही तर शेती! 27 वर्षांच्या तरुणीचा शेतीतून 45 लाखांचा नफा!

Anushka Jaiswal Success Story | No job after education but agriculture! A 27-year-old girl's profit of 45 lakhs from agriculture!

Anushka Jaiswal Success Story | उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील अनुष्का जयस्वाल ही 27 वर्षांची तरुणी शिक्षणानंतर नोकरी करण्याऐवजी शेतीत उतरली आणि आज ती 45 लाखांहून अधिक नफा कमावत आहे. 2021 मध्ये तिने लखनऊच्या मोहनलालगंज भागात एक एकर जमीन भाडेतत्त्वावर घेऊन शेतीची सुरुवात केली. दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून अर्थशास्त्राचे शिक्षण घेऊनही तिने नोकरी करण्याऐवजी वेगळा मार्ग निवडला.

कुटुंबाची पार्श्वभूमी शेतीची नसली तरीही…

अनुष्काचे वडील व्यापारी आणि आई गृहिणी आहेत. तर भाऊ पायलट, बहीण वकील आणि वहिनी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. कुटुंबाची पार्श्वभूमी शेतीची नसल्याने त्यांच्याकडे वडिलोपार्जित काहीही नव्हते. अशा परिस्थितीत प्रथम एक एकर जमीन भाडेतत्त्वावर घेण्यात आली. नंतर तीन एकर घेतले. त्यानंतर प्रशिक्षण घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षणही दिले. जास्तीत जास्त तंत्रज्ञान वापरले.

शेतीसाठी सरकारकडून 50 टक्के अनुदान

शेतीसाठी सरकारकडून 50 टक्के अनुदान मिळाले आणि एक एकरावर तिने सुरुवातीला पॉली हाऊस सुरू केले. हळूहळू यात भर पडत गेली आणि आता ती आणखी 6 एकरवर शेती करत आहे, ज्याठिकाणी सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर आणि इतर अनेक भाज्या आहेत. यातून त्यांना भरपूर नफाही मिळत आहे.

वाचा | Success Story | आयआयटी पासून पोल्ट्री फार्मपर्यंत! शेतकऱ्यांचा हक्क जपणारा हा तरुण उद्योजक वाचा कशी करतोय कमाल!

लोकांनी खच्चीकरण केले, पण…

अनुष्काला सुरुवातीला लोकांकडून खूप विरोध आणि टीका सहन करावी लागली. एका मुलीला शेती कशी करता येईल? असे प्रश्न उपस्थित केले गेले. पण अनुष्काला हार मानण्याची सवय नव्हती. मेहनतीने आणि चिकाटीने तिने आपले यश सिद्ध केले.

सेंद्रिय पद्धतीने शेती

अनुष्का सेंद्रिय पद्धतीने शेती करते. तिला फलोत्पादन विभागाकडून 90 टक्के अनुदान मिळाले. यामुळे भाजीपाला लागवडीचा खर्च कमी झाला आणि ती पिकांवर अधिक लक्ष देऊ शकली.

आदर्श बनलेली अनुष्का

आज अनुष्का जयस्वाल ही उत्तर प्रदेशमधील तरुण मुलींसाठी प्रेरणादायी ठरली आहे. शिक्षणानंतर नोकरीच्या पलीकडे जाऊन स्वतःचा व्यवसाय उभारण्याचे धाडस दाखवणाऱ्या अनुष्का जयस्वाल यांना खरंच सलाम!

Web Title | Anushka Jaiswal Success Story | No job after education but agriculture! A 27-year-old girl’s profit of 45 lakhs from agriculture!

हेही वाचा

Exit mobile version