इतर
ट्रेंडिंग

स्मार्टफोन हरवला का? ‘या’ टूलच्या सहाय्याने शोधा तुमचा हरवलेला स्मार्टफोन!

Lost your smartphone? Find your lost smartphone with this tool!

आजच्या युगात सर्व लोकांकडे स्मार्ट फोन आहे. ईमेल कॉन्टॅक्ट,खाजगी डाटा,बँकिंग,क्रेडिट, डेबिट कार्ड, एखादे योजनेचे एप्लीकेशन करायचे असेल, फॉर्म भरायचा असेल, एक ना अनेक कामे आपल्या मोबाईल वरून केली जातात. फोन आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झालेला आहे. परंतु स्मार्टफोन जेव्हा हरवतो. तेव्हा मात्र खूप वाईट वाटते. त्यामुळे त्यामध्ये आपला महत्वाचा डाटा असतो, कॉन्टॅक्ट नंबर असतात, काही वेळेला फोटोस असतात. त्यामुळे खूप वाईट वाटते. मात्र आता नाराज होण्याची गरज नाही. हरवलेला फोन शोधण्याचे नवे तंत्र विकसित करण्यात आले आहे.


हरवलेला फोन शोधण्यासाठी किंवा फोन चोरीला जाऊ नयेत यासाठी एप्पल आणि गुगलने एक नवीन टूल म्हणजे फाईन माय फोन (find my phone ). टूल विकसित केले आहे. मोबाईल धारकांनी याकरता गुगल अकाउंट ला लॉगिन करणे गरजेचे आहे. तिचा फोन मोबाईल डाटा किंवा वायफाय कनेक्ट असणे गरजेचे आहे. जेणेकरून तो गुगल प्ले स्टोअर वर दिसू शकेल तसेच या फोनची लोकेशन सेटिंग चालू असणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टी झाला तर तुम्हाला तुमचा स्मार्टफोन मिळण्यास अडचण येणार नाही.


फोन शोधण्यासाठी तुम्हाला android.com/find या लिंक वर जाऊन लॉग इन करणे आवश्यक आहे. एकदा साइन-इन केल्यास मोबाईल धारकाला स्क्रीनच्या वरती डाव्या कोपऱ्याला दिसेल. त्या काठावर अनेक फोन असतील जर तो फोन हरवला आहे तो सिलेक्ट करा त्यानंतर फोनची बॅटरी लाईफ बाकीचे ऍक्टिव्हिटीज दिसतील तसेच वायफाय कनेक्शन आदी गोष्टी तुम्हाला दिसतील. त्यानंतर गुगल फोनच जवळपास जाणारा लोकेशन गुगल मॅप वर दाखवेल त्याबरोबर युजरला आपल्या हरवलेल्या त्यामुळे फोन नेमका कुठे आहे हे सापडण्यास मदत होईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button