ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
जॉब्स

मोदी सरकार देत आहे शानदार कमाई ची संधी! करा ‘हा’ व्यवसाय आणि मिळवा भरघोस फायदा.💰💰💰

Modi government is giving a chance to earn great money! Do the 'yes' business and reap the benefits

तुम्हाला वेगळ्या क्षेत्रात काहीतरी करून वेगळे अस्तित्व निर्माण करायचे असेल, तर ही संधी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला शेती क्षेत्रात आपला व्यवसाय सुरु करायचा असेल. मात्र शेतीविषयक ज्ञान नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने एक योजना सुरू केली आहे. आपण यातून वेगळे अस्तित्व निर्माण करत नाही, तर त्यातून भरघोस उत्पन्न मिळू शकता. अशा परिस्थितीत रोजगाराच्या शोधात असलेल्या खेड्यातील लोकांना या योजनेचा मोठा फायदा घेता येईल. (Soil Health Card Scheme : You can earn good money from this Yoja detailed information about this).


ज्या अवलिया लोकांना वेगळे काही करायचे आहे. व त्यासाठी कष्ट करण्याची तयारी देखील आहे. वेगळ्या क्षेत्रात नोकरी करायचे आहे. व नाव कमवायचे आहे. अशा लोकांसाठी ही योजना खूप प्रभावी ठरू शकते.वेगळ्या मार्गाने रोजगार मिळू शकतो. व लवकरात लवकर नफा देखील कमवू शकता.
जर तुम्हालाही या योजनेद्वारे पैसे कमवायचे असतील. तर आपल्याला या योजनेची माहिती घ्यावी लागणार आहे.

👉 काय आहे ही योजना

केंद्र सरकारच्या योजनेला सॉईल हेअल्थ कार्ड स्कीम(Soil Health Card Scheme )असे नाव देण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून गाव पातळीवर मिनी सोईल टेस्टिंग लॅब ची स्थापना केली जाईल. आणि यातूनच तुम्हाला पैसे मिळू शकतात त्यात रोजगाराची मोठी संधी देखील आहे.अशा प्रयोगशाळांची खूप मोठी आवश्यकता गावपातळीवर आहे.


यामध्ये शेतातील मातीची चाचणी केली जाते. मातीत आढळणारे पोषक घटक शोधून काढले जातात. चाचणीनंतर त्यात सुधारणा करता येते. त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढण्यास खूप मदत होते. सॉइल हेल्थ कार्ड देण्यासाठी सरकारकडून तीनशे रुपये प्रति नमुना इतके पैसे देण्यात येत आहेत. माती तपासल्यानंतर समजते कि लागवडीच्यावेळी तुम्हाला किती खत द्यावे लागेल? आणि सदर मातीत कोणते पीक घ्यायला हवे? याबरोबरच त्याला कोणत्या खताची गरज आहे. सर्व खताविषयी माहिती मिळते.

👉 कोण सुरू करू शकते ही लॅब

📌 18 ते 40 वर्षे वयोगटातील ग्रामीण तरूण ही प्रयोगशाळा उघडू शकतात.
📌 यासह ऍग्रीक्‍लिनिक कृषी उद्योजक प्रशिक्षण द्वितीय श्रेणी सहा विज्ञान विषयात मॅट्रिक असणे आवश्यक आहे.

👉 किती खर्च आहे या प्रयोगशाळेला….

📌 साधारणपणे कोणतीही स्थापित करण्यासाठी सुमारे पाच लाख रुपये खर्च होतो. आपण या मृदा आरोग्य कार्ड योजनेचा फायदा घेण्यास त्यातील 75 टक्के रक्कम तुम्हाला सरकारकडून मिळते. म्हणजेच आपल्याला एक ते दीड लाख रुपये खर्च करावे लागतील. तुम्हाला चांगली कमाई देखील मिळू शकते.

👉 कुठे अर्ज करावा

अशी प्रयोगशाळा सुरू करण्याची इच्छा असलेल्या उमेद्वार शेतकरी किंवा संस्था जिल्हा कृषी उपसंचालक सहसंचालक किंवा त्यांच्या कार्य कडे प्रस्ताव पाठवू शकता यासाठी तुम्हाला agricoop.nic.in किंवा soilhealth.dac.gov.in या संकेत स्थळावर जाऊन योजना अर्ज करू शकता. किसान कॉल सेंटर वर कॉल करून अधिक संपर्क साधू शकता. किसान कॉल सेंटर 1800 180 1551 संपर्क करू शकता. सरकार जे पैसे देईल त्यापैकी काही रक्कम प्रयोगशाळा चालवण्यासाठी टेस्ट मशीन रसायने व इतर आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च केले जातात. संगणक प्रिंटर स्कॅनर जीपीएस वस्तू खरेदी करता येतात. या योजनेचा लाभ घेऊन भरपूर कमाई करू शकतो. तसेच वेगळ्या क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करू शकतो. तर चला वेगळ्या वाटचालीस सुरवात करून भरघोस कमाई करूयात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button