lang="en-US"> , काय खर: शेतकर्यांसाठी महत्वाचे, पीएम किसान योजनेचा हप्ता २ हजार ऐवजी

काय खोटं, काय खर: शेतकर्यांसाठी महत्वाचे, पीएम किसान योजनेचा हप्ता २ हजार ऐवजी ५ हजार येणार? पहा फॅक्ट..

PM Kisan Yojana installment will be Rs 5,000 instead of Rs 2,000? See the fact ..

मध्यंतरी पंतप्रधान किसान सन्मान निधीचा (pm kisan Sanman Nidhi) हप्ता २ हजार एवजी ५ हजार येणार आहे अशा अफवा पसरल्या होत्या. सोशल मिडीयावर सुद्धा हि बातमी चांगलीच धामाकुळ घालत होती. खरंच यात काही तथ्य आहे का याबद्दल पाहूया.

वाचा –

१ डिसेंबर २०१८ पासून पीएम किसान योजना राबविली जात आहेत. आपल्याला माहित आहे कि वर्षात ४ महिन्यांचे ३ हप्ते करत २ हजार रुपये प्रत्येक हप्त्याला शेतकर्यांच्या (farmers) खातात जमा होतात. या २ हजार ऐवजी ५ हजार रुपये जमा होणार आहेत अशी माहिती गेल्या काही दिवसांपासून पसरत आहेत.

याची पडताळणी करण्यासाठी Pmkisan.gov.in या वेबसाईट (website) वर पहिले असता असे दिसले कि या योजनेंतर्गत वर्षात ३ हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये दिले जातील. २ हजार ऐवजी ५ हजार दिले जाणार आहेत असे इथे नमूद केलेले नाही. तसेच २ हजार रुपयांऐवजी ५ हजार रुपयांचा हप्ता देण्यात येणार अशा कोणत्याही सूचना शासनाकडून (government) दिलेल्या नाही. त्यामुळे शेतकर्यांना या अफवांपासून सावध राहण्याचा इशारा दिलेला आहे.

वाचा

१० वा हप्ता डिसेंबर महिन्यात जमा होणार आहे. काही शेतकरी (farmers) या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित असतील तर हे शेतकरी फोनवर ऑनलाईन अर्ज भरू शकतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा 

Exit mobile version