lang="en-US"> Lampi Disease | लम्पी आजार झालेल्या जनावरांचं दूध प्यावं का नाही? जाणून घ्या एका क्लिकवर… - मी E-शेतकरी

Lampi Disease | लम्पी आजार झालेल्या जनावरांचं दूध प्यावं का नाही? जाणून घ्या एका क्लिकवर…

Lampi Disease | गेल्या काही वर्षांपासून लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. या काही महिन्यापूर्वी देखील या आजारात (Lifestyle) वाढ झाली होती. यामुळे हा आजार झालेल्या गुरांपासून दूध घ्यावं की नाही तसेच दूध प्यावं की नाही यावर ग्राहकांचे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये लम्पीबाधित पशू आहेत. आतापर्यंत 43 पशुंचा लम्पीमुळे मृत्यू झाला आहे. लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणास सुरुवात झाली आहे. लम्पीचा परिणाम दूध उत्पादन (Lifestyle) आणि विक्रीवर झाला नसल्याचं पशुसंवर्धन विभागानं सांगितलं आहे. लम्पीमुळे दूध उत्पादनावर कोणतेही निर्बंध लादण्यात आलं नसल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

वाचा: या शेतकऱ्याने खजूर आणि डाळिंब च्या शेती चां केला  अनोखा प्रयोग ! जाणून घ्या कोणता आहे प्रयोग?

लम्पी आजार नेमकं काय प्रकरण आहे:

लम्पी एक त्वचेचा रोग आहे. लम्पीची लागण झालेल्या पशुंना ताप येतो. त्यांच्या त्वचेवर गाठी येतात. यामुळे त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. संक्रमित डास, माशा आणि अन्य किटकांच्या थेट संपर्कात (Lifestyle) आल्यानं लम्पी रोग पसरतो. दूषित खाद्य, पाणी आणि हवेच्या माध्यमातून हा रोग पसरतो.

लम्पी रोग पशुंकडून माणसांपर्यंत पोहोचत नाही. पशुंकडून तो माणसांना होत नाही, अशी माहिती आयव्हीआरआयचे संयुक्त संचालक अशोक कुमार मोहंती यांनी दिली. लम्पी बाधित गायींचं दूध पिता येऊ शकतं. दूध व्यवस्थित उकळून घ्यावं. लम्पीमुळे दुधाच्या (Lifestyle) गुणवत्तेवर कोणताही परिणाम होत नाही, असं मोहंती म्हणाले. लम्पी रोग पशुंपासून माणसांना त्याची बाधा होत नाही. अशी माहिती आयव्हीआरआयचे संयुक्त संचालक अशोक कुमार मोहंती यांनी दिली.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Exit mobile version