lang="en-US"> Weather Update | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा सरासरीपेक्षा जास्त - मी E-शेतकरी

Weather Update | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! यंदा सरासरीपेक्षा जास्त पडणार पाऊस; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज


Weather Update | भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सून हंगामासाठी शुभ बातमी दिली आहे. शेतकऱ्यांसाठी आनंददायी असलेला अंदाज वर्तवण्यात आला आहे की, यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत १०६ टक्के जास्त पाऊस पडू शकतो. याचा अर्थ असा की, शेतकऱ्यांना पेरणीसाठी आणि पिकांच्या वाढीसाठी पुरेसा पाणी मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रासाठी चांगल्या मान्सूनची शक्यता:
हवामान विभागाने महाराष्ट्राच्या मान्सूनसाठी आशादायी अंदाज वर्तवला आहे. सध्याची परिस्थिती मान्सूनच्या दृष्टीने अनुकूल असून, दक्षिण पश्चिम मान्सूनसाठी समुद्राची स्थितीही चांगली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जून ते सप्टेंबर या कालावधीत सामान्य ते जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वाचा: सोयाबीनच्या दरात सुधारणा! शेतकऱ्यांनो जाणून घ्या कापूस, मका, तुरी आणि आले यांचे बाजारभाव

हवामान विभागाचे प्रमुख डॉ. एम. मोहबत्रा यांच्या मते यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. “हवामान विभागाने सर्व मॉडेल्सचा अभ्यास केला असून 5 जून ते 30 सप्टेंबरदरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यात 5 टक्के बदल होऊ शकतो.” सामान्य ते जास्त असा मान्सून होईल असा अंदाज आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांनो ऊस बांधणी का करावी? जाणून घ्या फायदे आणि योग्य पद्धत

अल निनोचा प्रभाव:
हवामान विभाग सध्या अल निनोवर लक्ष ठेवत आहे. सध्याची परिस्थिती पाहता अल निनोचा प्रभाव कमी होत आहे. त्यामुळे मान्सून पूर्व वातावरणासाठी हे चांगले आहे. डॉ. मोहबत्रा यांच्या मते, ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान ला निनोचा प्रभाव दिसून येण्याची शक्यता आहे. एकूणच, यंदाच्या मान्सून हंगामाबाबत शेतकऱ्यांसाठी चांगल्या बातम्या आहेत. सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, ज्यामुळे चांगल्या पिकांची शक्यता आहे.

Exit mobile version