ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Vidarbha Log March | शेतकऱ्यांना मोठा दिलासा! जलसंचय प्रकल्पांमुळे जमीन गमावलेल्यांना मिळणार मोबदला, विधानभवनावर धडकणार पायी लॉग मार्च!

Vidarbha Log March | Big relief for farmers! Those who lost land due to water storage projects will get compensation, log march on foot will hit Vidhan Bhavan!

Vidarbha Log March | विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलन सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या नेतृत्वाखाली विदर्भातील हजारो प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा पायदळ (Vidarbha Log March) लॉग मार्च नागपूर विधानभवनावर निघाला.

सरकारने विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी जलसंचय अनूशेषाच्या नावाखाली १८९४ चा भूसंपादन कायदा असताना देखील अल्प मोबदल्यात खरेदी केली. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट झाली आहे. त्यामुळे सरकारने भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांना मोबदला द्यावा, तसेच प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी या लॉग मार्चमध्ये करण्यात आली आहे.

लॉग मार्चमध्ये विदर्भातील अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यांमधील प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी झाले आहेत.

लॉग मार्च दरम्यान रात्रीचा पहिला दिवसाचा मुक्काम हा गुरुकुंज मोझरी येथे होणार आहे. त्यानंतर तळेगाव, कारंजा, कोंढाली, पेठ येथे रात्रीचा मुक्काम होणार असून १२ डिसेंबरला लॉग मार्च विधानभवनावर धडकणार आहे.

वाचा : Krushi Vahini Yojna | शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार! वाचा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची माहिती आणि मिळवा एकरी ५० हजार रुपये भाडे!

दरम्यान, प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर निर्णय झाल्याशिवाय प्रकल्पग्रस्त माघारी परतणार नसल्याची माहिती विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोज चव्हाण यांनी दिली आहे.

लॉग मार्चच्या मागण्या

  • भूसंपादन कायद्यानुसार शेतकऱ्यांना मोबदला द्यावा.
  • प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनाचे योग्य नियोजन करावे.
  • प्रकल्पग्रस्तांना नोकरीचे हमीपत्र द्यावे.
  • प्रकल्पग्रस्तांना आरोग्य सुविधा द्याव्यात.
  • प्रकल्पग्रस्तांना शिक्षण सुविधा द्याव्यात.

लॉग मार्चचे महत्व

विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी हा लॉग मार्च महत्वाचा टप्पा ठरणार आहे. या लॉग मार्चमुळे सरकारला प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांकडे लक्ष देण्यास भाग पाडले जाईल.

Web Title : Vidarbha Log March | Big relief for farmers! Those who lost land due to water storage projects will get compensation, log march on foot will hit Vidhan Bhavan!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button