lang="en-US"> Weather Update | 3 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान! - मी E-शेतकरी

Weather Update | 3 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान!

वर्धा, जळगाव आणि अमरावती या 3 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे उन्हाळी पिके आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर भागात गारपीट झाल्यामुळे तीळ, कोहळ, टरबूज, लिंबू यांसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामनेर मध्येही अवकाळी पाऊस पडला आहे. एकीकडे राज्यात उन्हाचा कडाका असताना दुसरीकडे अवकाळी पावसाची हजेरी नागरिकांना दिलासा देणारी ठरली आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात गारपीटसह वादळी वाऱ्याचा पाऊस पडला आहे. यामुळे गहू, संत्रा आणि कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. थुगाव आणि पिपरी या गावांमध्ये गारपीटामुळे संत्रा, गहू आणि कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे.

या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. सरकारने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा:

Exit mobile version