lang="en-US"> Today's Weather | शेतकऱ्यांनो जपून! उन्हाचा पारा चाळीशी पार; तरीही - मी E-शेतकरी

Today’s Weather | शेतकऱ्यांनो जपून! उन्हाचा पारा चाळीशी पार; तरीही वादळी पावसाचा इशारा, पाहा आजचे हवामान

Today’s Weather Forecast | राज्यात उन्हाचा ताप पुन्हा वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४० अंशांवर गेले आहे. काही ठिकाणी ४२ अंशांपर्यंत तापमान (Today’s Weather Forecast) नोंदवले गेले आहे. जळगाव येथे राज्यातील सर्वाधिक ४२.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. यामुळे लोकांना उन्हापासून त्रास होत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज (ता. २७) कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.

वाचा: राज्यात ‘या’ 7 जिल्ह्यांत विजा अन् मेघगर्जनेसह पाऊस; तर 11 जिल्ह्यांना उष्णतेची लाटेचा इशारा

मराठवाड्यापासून तमिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात ढगाळ हवामान होत असून पावसाला पोषक वातावरण आहे.

वाढत्या उष्णतेमुळे काय काय होत आहे?

वादळी पावसाचा इशारा असलेल्या ठिकाणी काय काय घ्यायची खबरदारी?

हेही वाचा: साठेखत म्हणजे काय? नोंदणीकृत साठेखताचे फायदे काय? जाणून घ्या एका क्लिकवर

पुढील काही दिवसांत काय हवामान राहण्याची शक्यता आहे?
हवामान विभागाच्या मते, पुढील काही दिवसांत राज्यात उष्णता कायम राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी पावसाचीही शक्यता आहे. नागरिकांनी हवामान अंदाजानुसार खबरदारी घेणे गरजेचे आहे.

Exit mobile version