ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
हवामान

Weather Forecast | राज्यात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज! ‘या’ ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या कुठे?

Weather Forecast | राज्यात जुलै महिन्यापासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. सातत्याने पडणाऱ्या मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने शेती पिकाचे नुकसान झाले आहे, तर काही ठिकाणी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला होता. अशातच, आता हवामान (Weather Forecast) विभागाने पुन्हा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे.

पावसाच्या जोरदार सरी
राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्यावर सातत्याने पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. त्यामुळे येथील नद्या, नाले आणि धबधबे ओसंडून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार असल्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्यामुळे यलो अलर्ट जारी केला आहे.

कुठे देण्यात आला ऑरेंज अलर्ट?
पुणे, सातारा आणि पालघर जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून बरसत असणाऱ्या मुसळधार पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, अजूनही मुंबईमध्ये सातत्याने संतधारा सुरूच आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Weather department predicts heavy rain in the state! Orange alert issued at this place, know where?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button