हवामान

Weather |बापरे!नोव्हेंबर ची थंडी आटोक्यात, मात्र डिसेंबर मध्ये कडाक्याची थंडी सह पावसाची शक्यता ..!

नोव्हेंबर ची थंडी आटोक्यात राहणार –

नोव्हेंबर( November) ते थंडी आटोक्यातच राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने ( Weather Department) दर्शवली आहे.महाराष्ट्रसह देशातील बहुतांश भागात नोव्हेंबर महिन्यात किमान तापमान ( Temperature) सरासरीच्या बरोबरीने किंवा सरासरीपुढे राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नोव्हेंबरची थंडी आटोक्यातच( Control) राहणार आहे . डिसेंबरपासून मात्र थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये अनेक भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचाही अंदाज आहे.

वाचा: शाहरुख खान चा ‘पठाण’ मुवी चा टिझर रिलीज; चित्रपटाची तारीख आली समोर; पहा व्हिडिओ..

काय आहे हवामान शास्त्र विभागाची माहिती –

हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार दक्षिण भारतात सध्या ईशान्य मोसमी पाऊस पडत आहे. तो सरासरीपेक्षा १२३ टक्के जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशभर नोव्हेबरमध्ये सरासरीच्या तुलनेत ३० टक्के पाऊस जास्त राहिल. या काळात ढगाळ वातावरण राहिल्याने थंडीचा कडका कमी जाणवेल. केवळ हिमालयीन भाग, पूर्वोत्तर राज्यात थंडीचे प्रमाण अधिक राहणार ( Weather Department) आहे. दिवसाचे कमल तापमान सरासरीखाली राहणार असल्याने उन्हाचा चटकाही कमी असेल.

डिसेंबर पासून थंडीचा कडाका वाढणार –

बंगालच्या उपसागरात अधूनमधून वाऱ्यांची चक्रीय स्थिती राहील. त्यातून कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत. परिणामी महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात हलका पाऊस पडेल. त्यामुळे नोव्हेबरमध्ये किमान तापमानत मोठी घट होणार नाही. नोव्हेबर अखेर पावसाळी स्थिती दूर झाल्यानंतर डिसेंबरपासून थंडीचा कडाका वाढत जाईल. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत थंडी राहू शकेल या दरम्यान अल्प पावसाची शक्यताही राहील. मात्र, त्याबाबतचे अंदाज वेळोवेळी जाहीर केले जातील, असे डॉ. महापात्रा यांनी( Weather Department) सांगितले.

वाचा: पीक विमा कंपीकडून आता पीक विमा ! तक्रारीसाठी करा या नवीन क्रमांकावर संपर्क…

थंडीवर पावसाचा परिणाम असा –

गेल्या काही वर्षांपासून नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास लांबतो आहे. ही बाब लक्षात घेऊन हवामान विभागाने पावसाच्या परतीच्या प्रवासाच्या नियोजित तारखा बदलल्या आहेत. मात्र, पाऊस या तारखांपेक्षाही पुढे जातो आहे. दक्षिणेतील ईशान्य मोसमी पाऊसही आता उशिराने सुरू झाला आहे. या सर्वांचा परिणाम थंडीवर आणि तिच्या कालावधीवर होत असल्याचे हवामान विभागाने ( Weather Department) दर्शवले आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

ब्रेकिंग न्युज: आता केंद्रसरकरकडून साखर निर्यातीवर एक वर्षासाठी बंदी; होणार शेतकऱ्यांवर परिणाम..

शेतकऱ्याच्या हितासाठी मांडल्या मागण्या.. दिला राज्यातील ऊस वाहतूक बंद पाडण्याचा इशारा..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button